Disha Shakti

राजकीय

नांदेड जिल्ह्यात भाजपाचे चलो अभियान खासदार चिखलीकर यांचा खेड्यात मुक्काम

Spread the love

बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : भारतीय जनता पार्टीतर्फे 4 ते 11 फेब्रुवारी या काळात व्यापक जनसंपर्कासाठी ‘गाव चलो अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानात उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis जी, प्रदेशाध्यक्ष Chandrashekhar Bawankule जी यांच्यासह राज्यातील सर्व केंद्रीय मंत्री, प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार आहेत, हे अभियान नांदेड जिल्ह्यातही राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील भाजपा लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी नेमून दिलेल्या गावात मुक्कामी राहणार आहेत. अशी माहिती खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तम संघटनात्मक बांधणी करत, विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून भाजपा कार्य करत आहे. तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारचे मागच्या 10 वर्षातील प्रभावी कार्य, मागच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी ही सर्व माहिती पोहोचण्याच्या उद्देशाने ‘गाव चलो अभियान’ हाती घेण्यात आले आहे. मोदीजींची गॅरंटी काय आहे. हे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी मागच्या 10 वर्षातील मोदी सरकारच्या योजना व उल्लेखनीय कामगिरीची माहिती देणारी पत्रके वितरित करण्यात येणार आहेत.

शहरी भागात वॉर्ड निहाय हे अभियान राबविले जाईल. या अंतर्गत 50 हजार युनिट्समध्ये भाजपाचे 50 हजार प्रवासी नेते, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार आहेत. पक्षाचे आजी व माजी खासदार, आमदार, जि.प सदस्य यांच्यासोबतच सर्व नेतेमंडळी जिल्ह्यातील प्रत्येक युनिटमध्ये प्रवास करतील व त्यांना सुपर वॉरियर्सचे देखील सहकार्य मिळेल अशी माहिती खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली.प्रत्येक युनिटमध्ये भाजपाचा प्रवासी नेता एक दिवस मुक्काम करून, बुथ प्रमुखांच्या बैठका, नागरिकांच्या भेटी, नव मतदारांशी चर्चा अशी आखून दिलेली 18 संघटनात्मक कामे करेल असेही खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले.

गाव चलो अभियान नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येत असून, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे नायगाव येथे मुक्कामी असणार आहेत . भाजपा भोकर शहर, पक्षाचे आमदार त्यांच्या त्यांच्या सोई प्रमाणे मुक्काम करतील व कार्यक्रम कळवतील अशी माहिती खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यावेळी दिली.यावेळी भाजपचे गंगाधर जोशी, प्रवीण साले, संतुक हंबर्डे, अजयसिंग बिसेन, देवीदास राठोड, ॲड. किशोर देशमुख, मिलिंद देशमुख ,प्रवीण पाटील चिखलीकर, लक्ष्मणराव ठक्करवाड, शिवराज पाटील होटाळकर, श्रावण पाटील भिलवंडे, विजय गंभीरे, राज यादव आदींची उपस्थिती होती.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!