Disha Shakti

Uncategorized

शिलेगाव येथे श्रीमद् भागवत कथा महायज्ञ व भव्य कीर्तन मोहत्सवाचा महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सप्ताहाचा श्री गणेशा

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे  : राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे १० फेब्रुवारी रोजी सुरू होत असलेल्या श्रीमद् भागवत कथा महायज्ञ व भव्य कीर्तन मोहत्सवाचा आज रोजी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज सरला बेट यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सप्ताहाचा श्री गणेशा करण्यात आला.शनिवारी दि.१० फेब्रुवारी १७ फेब्रुवारी या कालावधीत चालणाऱ्या भव्य कीर्तन महोत्सवात दैनदिन कार्यक्रम दररोज सकाळी ११ ते १ यावेळेत नामानंत महाराजांचे हरीकिर्तने होणार आहेत तर दुपारी २ ते ३ यावेळेत प्रवचन होणार आहेत तसेच सायंकाळी ६ ते ९ यावेळेत श्रीमद् भागवत कथा होणार आहे या सप्ताहासाठी दहा एकरावरील क्षेत्रामध्ये भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली असून येणाऱ्या भाविकांच्या चार चाकी ‘ दुचाकी वाहनांची सुरक्षित व्यवस्था व्हावी म्हणून स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे या सप्ताहाच्या कालावधीत शनिवार दि.१० फेब्रुवारी दुपारी एक ते पाच या वेळेत श्रीमत भागवत ग्रंथ भव्य मिरवणूक व पूजन करण्यात येणार आहे सायंकाळी पाच वाजता महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून या सप्ताहा साठी शिलेगाव व पंचक्रोशीतून येणाऱ्या भाविकांसाठी आमटी भाकर या महाप्रसादाची सकाळ दुपार संध्याकाळ पंगत होणार आहे भाविकांनी याचा लाभ घ्यावा.

  हा सप्ताह यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शीलेगावचे उपसरपंच डॉ.पांडुरंग म्हसे, सुरेशराव म्हसे, बंगाळ साहेब, नितीन म्हसे, कोंढवडचे सरपंच अर्जुन म्हसे,अनिल आढाव, ज्ञानेश्वर म्हसे उत्तम नाना म्हसे , सर्जेराव म्हसे ,नानासाहेब कोळसे, भगवान म्हसे, गोरक्षनाथ उंडे, बाबासाहेब वने, संतोष देवरे, अशोक देवरे, सदाशिव तागड , पांडुरंग तागड ,आदिनाथ वाघ, विजय माळवदे, डॉ. नेमाने, ह.भ. प. मच्छिंद्र महाराज ढोकणे ह.भ.प. संजय महाराज म्हसे, प्रभाकर म्हसे ,कैलास म्हसे, निलेश म्हसे, दिपक म्हसे, बाळासाहेब म्हसे, रवींद्र म्हसे,दादा म्हसे,संजय देवरे आदी परिश्रम घेत आहे. यावेळी पत्रकार राजेंद्र पवार, सोमनाथ वाघ,अशोक मंडलिक, रमेश खेमनर, प्रमोद डफळ, राजेंद्र म्हसे यांचा सत्कार महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!