भारत कवितके / मुंबई कांदिवली : सोलापूर बेलाटी या ठिकाणी सद्गुरू बाळूमामा मंदिर, विजापूर हायवे येथे २४ फेब्रुवारी शनिवार व २५ फेब्रुवारी रविवार रोजी दोन दिवसीय आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे धनगर साहित्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.पहिल्या दिवशी म्हणजेच २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते११:३०या वेळेत साहित्य ग्रंथ दिंडी काढण्यात येईल.
या दिंडीत गजी, लेझीम,झेल,अशी वेगवेगळी पथके आपली कला सादर करतील.त्याच दिवशी दुपारी १२ ते ३ या वेळेत साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा होणार असून तेथील ठिकाणास संत बाळूमामा नगरी असे नाव दिले आहे.विचार पिटाला श्री सिध्देश्वर महाराज हे नाव दिले आहे.उद्घाटन समारंभास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदें, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मा.आमदार राम शिंदे, मा.आमदार विजय देशमुख, मा.सुभाष देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय दासरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दुपारी ३ते ४:३० या वेळी परिसंवाद चे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६:३० ते ८:३० या वेळी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार दिनांक २५ रोजी सकाळी ९ वाजता दुसऱ्या सत्राचे उद्घाटन होईल.दुपारी४ ते ६ साहित्य संमेलनाचा समारोप करण्यात येईल. हे साहित्य संमेलन म्हणजे विचारांची देवाणघेवाण होऊन रसिकांना एक प्रकारची बौद्धिक मेजवानीच ठरेल. या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आमदार अँड.रामहरी रुपनर,तर स्वागताध्यक्ष पद श्री राम पाटील हे मान्यवर भूषविणार आहेत.असे अभिमन्यू टकले यांनी सांगितले आहे.
Leave a reply