प्रतिनिधी / शेख युनूस : अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते हनुमंता सखाराम खेमनर पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःख द निधन झाले. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि आदर्श सरपंच माननीय शंकरराव पाटील खेमनर यांचे वडील आणि तालुक्यातील साकुर पठार भागातील सर्वसामान्य जनतेचा नेता नामांकित व्यक्तिमत्व असलेले हनुमंता सखाराम खेमनर यांच्या अचानक जाण्याने संगमनेर तालुका आणि साकुर पठार भागावर शोककाळा पसरली असून गोर, गरीब जनता पोरकी झाली आहे.
साकुर गावाचे भाग्य विधाते आणि साकुर गावाच्या विकासाचा पाया ज्यांनी रोवला असे हनुमंता सखाराम खेमनर पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःख द असे निधन ०४/०२/२०२४ रोजी सायंकाळी झाले. संगमनेर पठार भागातील ते राजकीय, सामाजिक, क्षेत्रातील भीष्म पितामह होते, बारा बलुतेदार आणि आठरा पगड जाती सह सर्व समाजाला बरोबर घेत मोट स्व. हनुमंता खेमनर पाटील यांनी बांधली होती आणि आजवर ती कायम आहे.
राजकीय क्षेत्रात अग्रेसर असून त्यांच्या कामाचा आलेख उंचावर होता साकुर गावाला विकासाच्या जोरावर नंदनवन केल्यामुळे साकुरच्या इतिहासात स्व. हनुमंता सखाराम खेमनर पाटील हे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल हे नक्कीच.
साकुर पठार भागातील खंबीर नेतृत्व हनुमंता खेमनर यांचे दुःखद निधन, जिल्ह्यात पसरली शोककळा

0Share
Leave a reply