प्रतिनिधी / विठ्ठल ठोंबरे : श्रीरामपूर नेवासा रोड वरील एच. पी.पेट्रोल पंप शेजारी महाकाल टायर्स या दुकानातील काही अज्ञान तरुणांनी २७ डिसेंम्बर २०२३ च्या रात्री ८ ते २८ डिसेंबर २०२३ च्या सकाळी १० वाजेच्या सुमारास दुकानाचा कडी कोंडा तोडून चोरांनी दुकानातील ६२,५०० रुपये किंमतीच्या मालाची चोरी झाली होती त्या चोरीच्या घटनेसंदर्भात श्रीरामपूर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी बन्सी त्रंबक बर्वे वय ६८ वर्ष, व्यवसाय टायर दुकान, मु.पो.इंद्रानगर, पाण्याच्या टाकीजवळ,शिरसगाव यांनी गुन्हा नोंदविला होता.
त्यानुसार श्रीरामपूर पोलीस निरीक्षक यांनी तत्काळ दखल घेऊन आपल्या वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली पोलीस टीमने तपसाची सूत्रे फिरवत चोरी करणाऱ्या ०२ आरोपिंचा शोध घेऊन अटक करून पोलीसांनी ६२,५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. पोलिसांच्या या कारवाईच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल दुकानदार बन्सी बर्वे यांनी पोलीस निरिक्षक नितीन देशमुख साहेब, सहाय्य्क पोलीस निरीक्षक समाधान सोळके साहेब, सर्व पोलीस कर्मचारी तोडमल साहेब, कारकीले साहेब, बारसे साहेब, नरवडे साहेब ,लगड साहेब, अत्तार साहेब, खरात साहेब, पटारे साहेब यांचा पोलीस स्टेशन येथे जाऊन सर्वांचा सत्कार केला. यावेळी संतोष धुमाळ,देवेंद्र बोरा आदी उपस्थित होते.
श्रीरामपूर नेवासा रोडवरील महाकाल टायर्स दुकानाच्या चोरीतील आरोपिंना तत्काळ पकडण्यात पोलिसांना यश, दुकान मालकाकडून पोलिसांचा सत्कार..

0Share
Leave a reply