विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : पारनेर तालुक्यातील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचालित श्री ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टाकळी ढोकेश्वर येथे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात पार पडले यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना संस्थेचे अध्यक्ष रामचंद्रजी दरे म्हणाले की ढोकेश्वर विद्यालयाने गगनभरारी हा जो वार्षिक अंक प्रकाशित केला त्या नावाप्रमाणेच विदयालयाने गगनभरारी घेतली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की उत्तम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पेरणी करून ग्रामीण भागात बहुजन समाजाची शिक्षणाद्वारे प्रगती करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे आणि तो साध्य करण्यासाठी विद्यालयातील सर्व सेवक प्रामाणिक प्रयत्न करताना दिसतात.
यावेळी विद्यार्थ्यांनी काढलेल्या विविध चित्रांचे कलादालन, रांगोळी दालन, हस्तकला दालन, विज्ञान दालन यांचे उदघाटन संस्थेचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयाचा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला आणि गगनभरारी या वार्षिक अंकाचे प्रकाशन केले. तसेच विद्यालयातील विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेच्या पदाधिकारी यांच्या हस्ते केला.यावेळी संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त मा. सिताराम खिलारी सर, डॉ. चंद्रराव मोरे, ऍड.दीपलक्ष्मी म्हसे, सन्मा. मुकेशजी मूळे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी निर्मलाताई काटे, सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब खिलारी, प्रगतशील शेतकरी बबनराव पायमोडे सर, खरेदी विक्री संघांचे चेअरमन बाबासाहेब खिलारी, प्राचार्य सुनिल वाव्हाळ, पर्यवेक्षक डॉ. शिवाजी सावंत, शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब निवडुंगे, निलम खिलारी, कला विभागप्रमुख विजय सोबले, शास्र विभाग प्रमुख अशोक गांगड, समर्थ उद्योग समूहाचे रवींद्रशेठ पायमोडे, विक्रमशेठ झावरे, दत्तात्रय चौरे गुरुजी, उद्योजक हर्षद वाळुंज, बाळासाहेब गायकवाड, माजी उपप्राचार्य संजय कुसकर, संदीप गायकवाड इत्यादी ग्रामस्थ आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल ठाणगे सर व बाबासाहेब जाधव यांनी केले तर आभार रवींद्र मते यांनी मानले.
बहुजन समाजाची शिक्षणाद्वारे प्रगती करणे हा जिल्हा मराठा संस्थेचा मुख्य उद्देश : रामचंद्रजी दरे

0Share
Leave a reply