राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : गोटुंबे आखाडा येथे अनेक दिवसांपासून अवैध धंद्यास मोठया प्रमाणात वाढ झाली असून गावतील लहान तरुण शाळकरी मुले काही दिवसापूर्वी दारू पिल्याच्या अवस्थेत आढळून आले होते व आता चक्क महिलाच दारू पिल्याच्या घटना निदर्शनास आल्या असून दोन दिवसापूर्वी एक महिला भर दिवसा दारू पिऊन फुल्ल टल्ली होऊन धिंगाणा घातला व त्यानंतर सायंकाळी पती कामावरून घरी यायच्या भीतीने सदरील महिला दोन दिवसापासून फरार झाली असून अजूनपर्यंत महिला फरार असून वाढते अवैध धंदे याकडे गोटुंबे आखाडा गावातील लोकप्रतिनिधी याकडे पूर्णपणे डोळेझाक करत असून गावाकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याने तरुणांची ही दहशत वाढली आहे.
गावातील महिला ही सुरक्षित नसून गावात तरुणांची दहशत वाढली असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे आधीच गावात लोकप्रतिनिधींनी गावाला वाऱ्यावर सोडले असतानाच तरुणांची दहशत गुंडगिरी व अवैध धंद्यानी गावात जोर धरला असून हा ग्रामस्थांसाठी गंभीर विषय बनला आहे.ग्रामपंचायत मध्ये विविध विषयावर राहुरी खुर्द येथील सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून ग्रामपंचायत सदस्यांना विशवसात घेत नसल्याचे सदस्यांनी सांगितले आहे. राहुरी खुर्द ग्रामपंचायत येथे पतीराजांचा हस्तक्षेप वाढल्या मुळे अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गावामध्ये कोणत्याही उपाययोजना व जनजागृती नसल्याने गावात तरुणांची व अवैध धंदे वाल्यांची दहशत वाढली असून याकडे पोलीस प्रशसनाने गांभीर्याने लक्ष घालून यावर वेळीच आवर घालणे गरजेचे आहे
गोटुंबे आखाडा येथे तरुणांची दहशत अवैध धंद्यास जोर, राहुरी खुर्द ग्रामपंचायते गावाकडे साफ दुर्लक्ष

0Share
Leave a reply