Disha Shakti

Uncategorized

शिलेगाव येथे आजपासून श्रीपाद भागवत कथेस प्रारंभ

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे आज सरला बेट चे पिठाधिश महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज यांची श्रीपाद भागवत कथा होणार आहे.कथा संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत होणार आहे. सप्ताह दि.१० फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी २०२३ या काळात होणार आहे त्यामध्ये दि. ११ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.विशाल महाराज खोले (मुक्ताईनगर), दि.१२ फेब्रुवारी महंत श्री अर्जुन गिरी महाराज (शिंगी), दि.१३ फेब्रुवारी ह भ प महंत रामगिरी महाराज (वेळी ,पाथर्डी) दि .१४ फेब्रुवारी ह भ प ज्ञानेश्वर माऊली पठाडे कर्जत दिनांक १५ रोजी ह भ प महंत अमृत महाराज जोशी बीड दिनांक १६ फेब्रुवारी ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले ( देहू) यांचे किर्तन सकाळी ११ते १ या वेळेत होणार आहे.

तसेच दुपारी २ ते ३ यावेळेत पुढील प्रवचन होणार आहे. ह.भ.प. शंभू गिरी महाराज ( मानोरी) ह.भ.प. मच्छिंद्र महाराज ढोकणे( उंबरे) ह.भ.प. महेश महाराज खाटेकर (तांदूळवाडी) ह.भ.प.संजय महाराज म्हसे शिलेगाव ह.भ.प. किशोर महाराज जाधव (मानोरी) ह.भ.प. डॉ. नेमाने (ब्राह्मणी) यांची प्रवचन रूपी सेवा होणार आहे तसेच दि.१७ या दिवशी ११ ते १ या वेळेत महंत गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराज यांचे काल्याचे किर्तन होईल. तरी या भागवत कथेचा लाभ सर्व पंचक्रोशीतील भाविकांनी घ्यावा अशी आवाहन शिलेगाव व सर्व तालुक्यातील जनतेच्या वतीने करत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!