Disha Shakti

इतर

पारनेर तालुक्यातील ढोकी ‘ येथील जलजीवन पाणी योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे? चौकशीस सुरवात  

Spread the love

पारनेर प्रतिनिधी / वसंत रांधवण : पारनेर तालुक्यातील ढोकी गावच्या जलजीवन मिशन पाणी योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असा आरोप होत आहे. या कामाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची समिती नियुक्ती केली आहे. जिल्हा परिषदेने ३१ मार्च पर्यंत या ठेकेदाराची मुदत वाढवली असून हे बेकायदेशीर असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी व जिल्हा परिषदेने स्वतंत्र अधिकाऱ्याची चौकशी समिती नेमणूक केली.

२ ते ३ दिवसापूर्वी ढोकी गावातील जलजीवन च्या कामाची चौकशीचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समिती या ठिकाणी केला होता. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने के.बी. गुरव व पारनेर पंचायत समिती पाणी पुरवठा शाखा अभियंता पी.पी.पंडित रावसाहेब, ग्रामसेवक भाऊसाहेब या ठिकाणी आले असता या कामाची पाहणी केली.

सन २०२२ मध्ये ढोकी गावच्या जलजीवन मिशन पाणी योजनेसाठी १ कोटी ९९ लाख निधी उपलब्ध करून देण्यात आला. २२ जून २०२२ रोजी यादी तांत्रिक मान्यता देण्यात येवून १ ऑक्टोबर २०२२ रोजी इलेक्ट्रिकल अँड इंडस्ट्रियल या एजन्सीला कार्यारंभ आदेश देण्यात आला. जलजीवन मशीनची पाणी योजना करण्यासाठी १ वर्षाचा कालावधी म्हणजे १ आॅक्टोबर २०२३ रोजी पर्यंत देण्यात आला होता. परंतु सदर एजन्सी निवड ठेकेदाराने हे काम निकृष्ट दर्जाचे केले असून अनेक ठिकाणी पाईप जमिनीवर ठेवून त्याच्यावर सिमेंट टाकण्यात आलेले आहे. तर अनेक ठिकाणची पाईपलाईन उघड्यावर असून पाण्याच्या टाक्यांचे काम अद्याप अपूर्ण आहे.

या निवेदनावर प्रशांत धरम, गोरक्ष मोरे, कैलास नर्हे, बाबासाहेब नर्हे, नवनाथ वाकचौरे, अब्दुल पठाण, बाळू वाकचौरे, शिवाजी चितळकर, अक्षय वाकचौरे, बापू नर्हे, भास्कर डोलनर, प्रकाश मोरे, हुसेन पठाण, रावसाहेब डोईफोडे, अशोक नर्हे, धोंडीभाऊ धरम, बाजीराव मोरे, भाऊसाहेब भुसारी, सिंधू पवार, भगवान मोरे प्रवीण धरण तात्या भाऊ मोरे भाऊसाहेब मोरे किसन धरम सागर धरण सयाजी धरम शांताराम धरम, अक्षय धरम, मोहन डोईफोडे आदींसह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!