प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील धन्वंतरी कला व विज्ञान महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिराचे आज धोत्रे बुद्रुक, तालुका पारनेर येथे उद्घाटन संपन्न झाले. या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सचिव रेहान जी काझी , उद्घाटन अध्यक्ष मा. वनिताताई चंद्रकांत कसबे (सरपंच धोत्रे) , माननीय सौ.रोशनीताई राजू रोडे (उपसरपंच धोत्रे), सर्व ग्रामपंचायत सदस्य धोत्रे बुद्रुक, श्री.अशोक देवराम जाधव (मुख्याध्यापक श्रीमान शेठ होनाजी कोंडाजी ढोमे माध्यमिक विद्यालय, धोत्रे) मान.सासवडे गुरुजी, श्री बापूसाहेब रुपनर सर (मुख्याध्यापक माध्य.आश्रम शाळा ,ढवळपुरी) संदीप महांडुळे सर( मुख्याध्यापक. प्राथ. आश्रम शाळा, ढवळपुरी) , कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक जमील शेख सर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना संस्थेचे सचिव रेहानजी काझी सर म्हणाले, धन्वंतरी महाविद्यालय ढवळपुरी सारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देत असून या श्रमसंस्कार शिबिरातून त्यांना श्रमदान व सेवा यांचे संस्कार होतात. येणाऱ्या सात दिवसांमध्ये विद्यार्थी या ठिकाणी श्रमदान त्याचबरोबर विविध माहिती जमा करणे इत्यादी कामे करणार आहेत असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अतुल मोरे सर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रघुनाथ शेळके सर यांनी केले.
याप्रसंगी कार्यक्रम सह अधिकारी प्रा. जयश्री भोंडवे मॅडम, प्रा. कावेरी गवते मॅडम, प्रा. किरण कारंडे सर, प्रा.योगेश भुसारी सर, प्रा. सागर वाव्हळ ,प्रा. विशाल काळे , प्रा. राहुल शेलार, प्रा.रोहित जाधव, प्राध्यापक अनिल पवार, शिक्षकेतर कर्मचारी श्री .फारुख राजे, श्री. गणेश देशमुख, श्री.अभिजीत किंनकर, श्री. वैभव गावडे, श्री.शुभम गायकवाड, श्री.मोहित गोरड, विद्यार्थी प्रतिनिधी ,विद्यार्थ्नी प्रतिनिधी, सर्व विद्यार्थी, समस्त ग्रामस्थ धोत्रे बुद्रुक यावेळी उपस्थित होते.
Leave a reply