राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी खुर्द या गावांमध्ये एकाच रात्री 5 दुकाने फोडून हजारोंचा माल लपास केल्याची घटना 10 फेब्रुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून याबाबत मिळालेली माहिती अशी की राहुरी खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष गोरे यांचे साईकृपा नावाचे जनरल स्टोअर्सचे दुकान कुणीतरी अज्ञात भामट्याने चोरीच्या उद्देशाने कटावणीणे सेंटर लॉक उचकटून दुकानातील सुमारे दहा ते पंधरा हजार रुपयांचे शॉपिग मटेरियल लंपास केल्याची माहिती मिळाली
आहे तसेच चोरट्यांनी इतरही छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर डल्ला मारुन हात सफाई केली आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनास्थळी समक्ष भेट देवून पहाणी करुन माहिती घेतली योग्य तपास करण्याच्या सूचना दिल्या आहे व आपल्या सहकाऱ्यांना या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याच्या सुचना दिल्या आहेत. आपल्या सुरक्षेसाठी प्रत्येकाने आपल्या दुकानासमोर सी.सी. टिव्ही कॅमेरे बसुन घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी व्यावसायिकांना केले आहे.
काही अंतरावर असलेल्या राहुरी शहरातील व्यापारी बांधवांच्या वतीने एक कॅमेरा सुरक्षेसाठी अभियान सुरू असताना राहुरी खुर्द मध्ये घडलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे. घडलेल्या घटनेबाबत बीट हवालदारांकडून योग्य ती कारवाई करावी पो. नि. संजय ठेंगे यांना ग्रामस्थांकडून साकडे घालण्यात आले आहे.
Leave a reply