विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : दिनांक 06/02/2024 रोजी दुपारी 12/30 वा. सुमारास फिर्यादी महावीर सुभाषलाल पगारीया, वय 39 वर्षे, धंदा- किराणा होलेसेल दुकान, रा. वर्धमान हाऊसिंग सोसायटी, ए बिल्डींग, वार्ड नं. 07, श्रीरामपूर, यांची छ. शिवाजी महाराज चौक, श्रीरामपूर, खटोड मार्केट येथिल होलसेल किराणा दुकानातील बँकेमध्ये भरणा करण्याकरीता ड्राव्हरमध्ये ठेवलेली रोख रक्कम अज्ञात इसमाने लबाडीच्या इरादयाने स्वताचे आर्थिक फायदयाकरीता चोरुन नेली वगैरेच्या तक्रारीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं. 134/2024 भादंवि कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हा दाखल होताच मा. पोनि. नितीन देशमुख सो. यांनी तपास पथकास सदर गुन्हयातील चोरी गेलेली रोख रक्कम व आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथक तात्काळ घटनास्थळी जावुन पाहणी करुन गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेवुन तसेच तांत्रिक विश्लेषण केले असता सदरचा गुन्हा हा आरोपी नामे 1) सागर डुकरे, रा. टाकळीभान, ता. श्रीरामपूर याने केला असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदर आरोपीचा त्याचे राहते घरी शोध घेतला असता तपास पथकास पाहुन एक इसम पळुन जावु लागला असता तपास पथकाने त्याचा शिताफिने पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले व त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) सागर नारायण डुकरे, वय 31 वर्षे, रा. टाकळीभान, ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर असे असल्याचे सांगुन सदर गुन्हयाबाबत त्याच्याकडे तपास केला असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली, त्यास विश्वासात घेवुन त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याला नमुद गुन्हयात अटक करण्यात आली व त्याच्याकडुन गुन्हयातील चोरी केलेली रोख रक्कम जप्त करण्यात आली ती खालील प्रमाणे,
1) 55,000/- रु. रोख रक्कम त्यात 500,200,100 रु. किंमतीच्या भारतीय चलनी नोटा.
55,000/- रु. एकुण रोख रक्कम
वरील वर्णनाची गुन्हयातील चोरी केलेली रोख रक्कम आरोपीकडुन जप्त करण्यात आली असुन नमुद गुन्हयात आरोपीस अटक करुन सदरचा गुन्हा हा तात्काळ उघडकीस आणला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे साहेब तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख, यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, परि. पोलीस उपनिरीक्षक/ दिपक मेढे, पोहेका/ सचिनकुमार बैसाणे, पोना/रघुवीर कारखेले, पोकों/ राहुल नरवडे, पोकॉ/ गौतम लगड, पोकों/ रमिझराजा अत्तार, पोकों/ संभाजी खरात, पोकॉ/अजित पटारे, पोको/अमोल नागले, पोकों/आकाश वाघमारे तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोना/संतोष दरेकर, पोना/ सचिन धनाड, पोकों/वेताळ यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साो यांचे मार्गदर्शनाखाली पोहेको/ सचिन कुमार है बैसाणे हे करीत आहेत.
खटोड मार्केट श्रीरामपूर, येथील किरणा दुकानातील रोख रक्कम चोरास अटक, 55000/- ह.रुपये जप्त, श्रीरामपूर शहर पोलीसांची कामगिरी

0Share
Leave a reply