Disha Shakti

क्राईम

आधी शिक्षक तर आता डॉक्टर , नगरमध्ये लैंगिक शोषणाचा आणखीन एक प्रकार समोर

Spread the love

प्रतिनिधी / जितू शिंदे : नगर इथे एक खळबळजनक घटना समोर आलेली असून उपचारासाठी म्हणून एका डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या विळद इथे समोर आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार , डॉक्टर अंगद खाडे ( राहणार विळद तालुका नगर ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याला अटक केलेली असून न्यायालयाने त्याला 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत.आरोपी खाडे हा रविवारी दुपारी क्लिनिकमध्ये असताना अल्पवयीन मुलीवर उपचार करण्याचा बहाणा करत त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि हा प्रकार कोणाला सांगितला तर जिवे मारण्याची धमकी दिली असे पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. 

दुसऱ्या एका घटनेत नगर शहरातील तारकपूर परिसरातील एका महाविद्यालयात ‘ तू मला काय देणार ‘ असे म्हणत नापास करण्याची भीती दाखवत सतीश शिर्के नावाच्या एका शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलेला होता. सतीश शिर्के देखील सध्या पॉक्सो आणि विनयभंग प्रकरणी अटकेत असून अशा घटना समोर येत असल्याने महिला आणि मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!