विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : पारनेर तालुक्यातील हंगा व गांजीभोयरे येथे राज्य सरकारने दि.२६ जानेवारी रोजी काढलेल्या मराठा आरक्षण संदर्भातील जीआर विरोधात हरकती मागविल्या नंतर येथील ओबीसी बांधवांनी सामुहिकपणे एकाच वेळी १० हजार हरकती टपालद्वारे रवाना केल्या असल्याची माहिती प्रसाद खामकर व येथील ओबीसी बांधवांनी दिली आहे.
सामुदायीकपणे एवढ्या मोठ्या प्रमाणात हरकती दाखल करणारे हे जिल्ह्यातील पहिला तालुका असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. राज्य सरकारने दि.२६ जानेवारी रोजी मराठा आरक्षणावर जीआर काढला व त्यावर ज्या कुणाला हरकती घ्यायच्या असेल त्यांनी दि.१६ फेब्रुवारी पर्यंत आपल्या हरकती दाखल कराव्यात असे सांगितले होते. त्यानुसार पारनेर तालुक्यातील हंगा , सुपा पंचक्रोशी आणि गांजीभोयरे परिसरातिल ओबीसी बांधवानी सगेसोयरे कायदयाला विरोध करण्यासाठी कंबर कसली आहे. या प्रकरणासंदर्भात हरकती मागवण्याची प्रक्रिया सुरु आहे.
आतापर्यंत हंगा , सुपा आणि गांजीभोयरे परिसरातुन १० हजारांपेक्षा जास्त हरकती सचिव, सामाजिक न्याय विभाग , मंत्रालय , मुंबई येथे पोहोच करण्यात आल्या आहेत. हरकतीसाठी अजून दोन दिवस मुदत आहे. यामुळे पारनेर तालुक्यातील हरकतीचा आकडा दहा हजारांहून पेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी या कायद्याला विरोध केला आहे. हंगा गावचे विद्यमान सरपंच राजू शिंदे, मुंगशी गावचे माजी सरपंच राजेंद्र शिंदे, गणेश नवले , सुहास नगरे , महेश शिंदे , गोकुळ नगरे , प्रसाद खामकर बाळासाहेब नवले , वैभव नगरे , सागर झोके , अजित नगरे , गोविंद शिंदे , किरण शिंदे , अनिकेत नवले आदी ओबीसी बांधवानी या मोहिमेत महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
Leave a reply