प्रतिनिधी / प्रमोद डफळ
राहुरी तहसील कार्यालयासमोर राहुरी तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंनी रस्त्यासाठी आमरण उपोषण धरणे आंदोलन केलेले आहे. अन्नदात्याला उपोषण करण्याची वेळ येते हे शेतकऱ्यांचे दुर्दैव शेतकरी हा देशाचा आधारस्तंभ आहे परंतु या आधारस्तंभालाच उखडून टाकण्याचे धोरण सध्या चालवलेला आहे. सध्या शेतकरी अनेक प्रकारच्या संकटात असताना हे रस्ते ही संकट आ वासून उभी आहे. शेतकऱ्यांना आपला माल शहरापर्यंत नेण्यासाठी गावातूनच रस्ता नाही? तसेच शाळेतील मुलांना सुद्धा जाण्यासाठी रस्ता नाही? सदर शेतकऱ्यांची दिशाभूल होत आहे. वस्तीवर जाण्यासाठी कुठलेच रस्ते नसल्यामुळे अनेकांना अडचणीला तोंड द्यावे लागते. असे या संदर्भात शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करूनही कुठल्याही प्रकारचा शासनाचा आजपर्यंत हिरवा कंदील दाखवलेला नाही. तसेच जुने रस्ते पूर्ण झालेले नाहीत आणि हे रस्ते दादागिरी दहशत या मार्गाने तार कंपाउंड करून मोडीत काढलेले आहेत. कुठे नेऊन ठेवलाय शेतकरी माझा पै. पानसरे सीबी व शरद पवळे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण अहमदनगर जिल्हाभर अशाच प्रकारचे आंदोलने प्रत्येक तालुका तहसीलदार कार्यालयासमोर चालू आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गाव रस्त्यामध्ये जातील त्यांना शासनाने योग्य रक्कम दिली पाहिजे म्हणजे रस्ते मिळतील वाद सुद्धा संपुष्टात येतील.
सदर कार्याला पै. पानसरे सीबी यांनी पूर्ण पाठिंबा देऊन मार्गदर्शन केलेले आहे. प्रत्येक तालुक्याला शेतकऱ्यांच्या शेती संदर्भात अनेक कोर्टकेस चालू आहेत या घटनेला शेतकरी वैतागून शेती सोडून दुसरीकडे मोल मंजुरी करतात. जवळजवळ राहुरी तालुक्याचा विचार करता शेतकऱ्यांच्या पाच हजार पेक्षा जास्त केसेस शेतीच्या भांडणावरून आहेत. अनेक ठिकाणी कोर्टाचे निकाल देऊनही रस्ते झालेले नाहीत तसेच शिव रस्ते सुद्धा खुले झालेली नाही तर काही ठिकाणी गाव-गावातला जाण्यासाठी रस्ता सुद्धा कोणत्याच प्रकारचा नाही. त्याच्यातूनच अनेक शेती पडकला पडलेले आहेत व पोलीस स्टेशनला अनेक वादविवाद निर्माण झालेली आहेत. त्याच्यातून पिढ्यानपिढ्याचे वाद निर्माण होऊन शेतकऱ्यांनी याच कारणास्तव अनेक खून केल्याच्या घटना घडलेल्या आहेत व प्रत्येक गावात वादाचे कारण म्हणजे शेत आहे. परंतु या घटनेकडे कोणाचेही लक्ष नाही.