राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : सतरा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने पळून नेलेले असल्याबाबत अल्पवयीन मुलीची आई हिने राहुरी पोलीस स्टेशन गु र न 1000 /23 भारतीय दंड विधान संहितेचे कलम 363 अन्वये दिनांक 01/09/23 रोजी गुन्हा दाखल असून दाखल गुण्हयाच्या तपासामध्ये तांत्रिक विश्लेषनावरून आरोपी 1)परशुराम केशव निकम , वय 21, राहणार बारागाव नांदूर, यास दिनांक 15/02/2024 रोजी दाखल गुन्ह्याच्या तपास कामी संगमनेर येथून ताब्यात घेवून पीडीतेचा शोध घेऊन पीडितेची सुटका करून तीस तिचे आईं चे ताब्यात देऊन आरोपीस सदर मुलीस पळवून नेण्यास मदत करणाऱ्या आरोपी 2). सिताराम बाळासाहेब गायकवाड वय 32 वर्ष 3) आकाश सुनील पवार वय 19 वर्ष राहणार बारागाव नांदूर यांना ही दाखल गुन्ह्यात अटक केली असून सदर गुन्ह्यात सहाय्य करणाऱ्या अजून दोन आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच सदर गुन्ह्यात भादवी 366, ३७६ व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम कलम 4,8 वाढविण्यात आलेले आहे
अटक तिनही आरोपींना पोलीस कस्टडी रिमांड घेण्यासाठी मान्य न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सदर गुन्ह्याचा तपास PSI धर्मराज पाटील करत आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे , विभागीय पोलीस अधिकारी डॉ.श्री.बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात PSI धर्मराज पाटील, साहेब फौजदार औटी, पोकॉ.गणेश लिपणे, प्रमोद ढाकणे, नदीम शेख, सागर नवले मपोहेकॉ. स्वाती कोळेकर यांच्या पथकाने केलेली आहे. अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणे तथा लैंगिक अत्याचार करणे अशा गुन्ह्यात कुणाकडून अनवधानाने सहकार्य /मदत झाली असल्यास वा कुणास अशा प्रकारच्या गुन्ह्याबाबत माहिती असल्यास त्यांनी सदर माहिती पोलिसांना पुरवावी. त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
राहुरीतून पळवुन नेलेल्या 6 व्या अल्पवयीन मुलीचा शोध, मुख्य आरोपी व त्यास मदत करणारे दोन साथीदारांसह एकूण तिघे अटक, अजून दोघांचा शोध सुरू

0Share
Leave a reply