Disha Shakti

क्रीडा / खेळ

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलठाणने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रथम मिळवत बाजी मारली

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / शेख युनूस : राहुरी तालुक्यातील डोंगराळ आणि दुर्गम भागातील शेरी चिखलठाण येथील चिखलठाण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विदयार्थाची निवड करून क्रीडा स्पर्धेत मैदानी खेळ, लांब उडी,उंच उडी,कबड्डी, खो खो आणि पन्नास मीटर धावणे आदी स्पर्धचे आयोजन करून तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून शाळेचे नांव जिल्ह्यात गाजवले आहे. सविस्तर माहिती अशी की तालुका स्तरीय स्पर्धेचे आयोजन हे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे महात्मा फुले क्रीडा भवन या ठिकाणी करण्यात आले होते.

चिखलठाण येथील जिल्हा परिषद शाळेत जिल्हा परिषद अंतर्गत विविध क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा घेतल्या जातात यामुळे शालेय विद्यार्थी यांचा सर्वागीन विकास व्हावा या उद्देशाने क्रीडा स्पर्धेचे आयोजन करून प्रत्येक विद्यार्थाची बारकाईने लक्ष देत आपुलकीने तीक्ष्ण गुणवंत मेहनती, गुणवंत विदयार्थी निवडून वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा घेत येथील शिक्षकानी आणि विद्यार्थांनी आपल्या जिल्हा परिषद शाळेचे नाव जिल्ह्यात गाजवले आहे.

वैयक्तिक स्पर्धेत पन्नास मीटर धावने यामध्ये छोटया गटातून मुलीमध्ये प्रथम क्रमांक.१. प्रांजल भारत काळनर हिने बाजी मारत प्रथम क्रमांक मिळविला. लांब उडीमध्ये मोठया गटातून प्रथम क्रमांक. 1, काव्याजली आदिक डोलनर हिने लांब उडी घेत मुलीमध्ये प्रथम क्रमांक घेतला. उंच उडीमध्ये प्रथम क्रमांक. १.ओमकार आबासाहेब काकडे याने उंच उडी घेत गगन भरारी मारत बाजी मारून प्रथम क्रमांक पटकविला. मोठा गट १०० मीटर धावने यात आदिल शेख याने प्रथम क्रमांक मिळविला. सामूहिक क्रीडा स्पर्धेत खो. खो.या खेळात आनम शेख, प्रगती काळनर, काव्याजली डोलनर,आदी मुलींनी बाजी मारून पुन्हा जिल्ह्यात आपल्या शाळेचे नाव लौकिक करत क्रीडा स्पर्धेत बाजी मारली.

यावेळी आंबेकर सर,नागटिळक सर, सारोक्ते सर, काकडे सर, ह.भ .प. गाडेकर महाराज सर, बाचकर सर, आणि मुख्याध्यापक माननीय रोडे सर यांच्या मार्गदर्शना खाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलठाण चे. जिल्ह्यात नाव लौकिक झाले असून विदयार्थी आणि शिक्षकांचे कौतुक होत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!