Disha Shakti

क्राईम

म्हैसगाव पेट्रोल पंपाजवळील रस्त्यावर जबरी चोरी करणारा एक आरोपी गजाआड व पोलिसांमार्फत दोघांचा शोध सुरू

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / शेख युनूस : राहुरी पोलीस ठाणे गु.र.न.55/2024 ipc 394, 341, 504,506,34 मधिल 3 पैकी 1 आरोपी मच्छिंद्र चांगदेव बाचकर वय 29 रा घोरपडवाडी यास अटक केली असुन सदर आरोपीस दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली सदर गुन्ह्यातील इतर दोन आरोपीचा शोध घेणे बाकी आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील व लेखनिक पो.कॉ.गणेश लिपने गुन्ह्याचा तपास करीत आहेत .

सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे, विभागीय पोलीस अधिकारी डॉ.श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, हो.हवा यादव, पोकॉ.गणेश लिपणे, प्रमोद ढाकणे, यांच्या पथकाने केलेली आहे. सदर अशा प्रकारच्या गुन्ह्याबाबत माहिती असल्यास त्यांनी सदर माहिती पोलिसांना पुरवावी. त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!