बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार (कासराळीकर) :बिलोली तालुक्यातील मौजे कासराळी येथे लोकनेते खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून मौजे-कासराळी ता.बिलोली येथे कासराळीचे ग्रामदैवत श्रीखाकेश्वर मठ संस्थान सुशोभीकरणासाठी-10 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. खाकेश्वर मठाचे सचिव लक्ष्मणराव ठक्करवाड यांच्या सततचा पाठपुराव्यामुळे हा निधी मंजुर झाला आहे.
खाकेश्वर मठ संस्थान च्या वतीने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर तसेच लक्ष्मणराव ठक्करवाड यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे. तसेच मुस्लिम कब्रस्तान ते ईदगाहापर्यंत सि.सि.रोडसाठी 5 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. सदर निधीसाठी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड तसेच अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष शेख युनूस कासराळीकर यांच्या सततच्या पाठपुरावा व प्रयत्नामुळे हा निधी मंजूर झाला आहे. त्याबद्दल कासराळी ग्रामस्थांचा वतिने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांचे अभिनंदन करण्यात आले.
सदरील कामाचे नारळ फोडून भूमिपूजन करताना मा.लक्ष्मण ठक्करवाड जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा सरचिटणीस, डॉ.के.बी. कासराळीकर रोजगार हमी तालुका अध्यक्ष तसेच भाजपा कार्यकर्ते, सोमलिंग पाटील कासराळीकर माजी उपसरपंच,सरपंच प्रतिनिधी संभाजी टोम्पे, उपसंरपंच प्रतिनीधी माधव दंत्तापल्ले, बसवंत पा.कासराळीकर माजी उपसरपंच प्र,संभाजी शेळके माजी पं.स.सदस्य, इंजिनिअर नामदेव भाऊ, बाबु महाराज, शंकर गंगुलवार सामाजिक कार्यकर्ते, अल्पसंख्यांक ता.अध्यक्ष शेख युनूस, मं.सुलेमान शेख आयुब,आफजल सेठ,शेख इस्माईल,बासीद कुरेशी ग्रा.प.सदस्य, आझम पठाण,बाबा शेख, मदार कुरेशी, वहिद मठवाले, युसुफ कुरेशी, आसिफ कुरेशी, सद्दाम शेख, शेख, वासिक शेख शाहरुख, शेख मसुद, शेख वाजिद,मं.फैजन,समद दालवाले आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून कासराळी येथे 15 लाखांचा निधी मंजूर

0Share
Leave a reply