विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील नायगांव जुने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी केंद्रस्तरिय व तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळविले आहे.अनिल इन्द्रभान गायकवाड (इ.३ री) याने केंद्रस्तरिय क्रीडा स्पर्धेत लहान गट मुले उंच उडी व धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच त्याने उंच उडी स्पर्धेत तालुक्यात दुसरा क्रमांक पटकाविला. कु.समिक्षा सुभाष तुपे (इ. ४ थी) हिने लहान गट मुली लांब उडी स्पर्धेत केंद्रात तिसरा क्रमांक तर कु.पुजा रमेश भवार (इ. ४ थी ) हिने लहान गट मुली धावणे स्पर्धेत केंद्रात तिसरा क्रमांक पटकाविला.
या यशाबद्दल विद्यार्थ्यांचा माता पालक मेळाव्यात सरपंच राजाराम राशिनकर, बापूसाहेब लांडे,संपतनाना लांडे, आरोग्यामित्र सुभाष गायकवाड, प्रमोद शेजुळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश लांडे, पोलीस पाटील राजेंद्र राशिनकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक संतोष वाघमोडे व शिक्षिका सुजाता सोळसे यांचे मार्गदर्शन लाभले आहे
Homeक्रीडा / खेळनायगांव जुने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे केंद्रस्तरिय व तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश
नायगांव जुने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे केंद्रस्तरिय व तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश

0Share
Leave a reply