विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : शहरातील टिळक वाचनालय येथे पार पडलेल्या वंचित बहुजन युवा आघाडीचा जनसंवाद मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला.युवा जिल्हा अध्यक्ष प्रवीण आल्हाट आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून झालेल्या या मेळाव्याला श्रीरामपूर जनतेने भरभरून प्रतिसाद दिला.
महाराष्ट्र राज्य निरीक्षक ऋषिकेश नांगरे, राज्य कार्यकारिणी सदस्य विशाल गवळी, राज्य कमिटी सदस्य चेतन् गांगुर्डे, प्रवक्ता दिशा शेख, प्रवक्ता डॉ. जालिंदर घिगे, अँड . रावसाहेब मोहन, जिल्हा सचिव सुनील ब्राम्हणे, युवा जिल्हा सचिव सुनील वाघमारे, भारिपचे जिल्हाध्यक्ष किरण साळवी, भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष सुगंध इंगळे, प्रकाश सावंत, संम्यक फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास नरोडे, ओम त्रिभुवन, यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये मेळावा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, अण्णाभाऊ साठे तसेच सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संदीप लोखंडे, सिद्धार्थ पटाईत, विशाल खंडागळे, आकाश पंडित, अमोल मिसाळ, संदीप येडके, कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a reply