Disha Shakti

क्राईम

अल्पवयीन तरुणीवर उसाच्या शेतात नेऊन बळजबरीने अत्याचार.! आरोपीस तरुणास अटक

Spread the love

संगमनेर प्रतिनिधी / शेख युनूस : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकुर परिसरातील तरुणाने महाविद्यालयीन अल्पवयीन तरुणीला धमकावून ऊसाच्या शेतात नेऊन बळजबरी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. साकूर गावच्या परिसरातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर जानेवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यात अनिकेत नवनाथ भुजबळ (वय 23 वर्ष) राहणार साकूर ता. संगमनेर येथील रहिवासी असलेल्या तरुणाने महाविद्यालयीन अल्पवयीन तरुणी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांच्या सुमरास घरी येत होती. यादरम्यान अनिकेत भुजबळ याचे दुकानासमोरून सदर तरुणी जात असताना ती लहान आहे .हे माहीत असताना. जाणून बुजून तिला धमकावून त्याचे दुकाना शेजारी असलेल्या उसाच्या शेतात बळजबरीने नेले.ती नको नको म्हणत असताना तिच्या कुटुंबाला संपविण्याची धमकी दिली. यानंतर तिच्यावर जबरदस्तीने शरीर संबंध केले. यानंतर तिने त्याला समजावून सांगितले .तरी देखील त्याने वारंवार जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्यासोबत काढलेले फोटो वायरल करण्याची धमकी देत तिचा गैरफायदा घेतला. 

     याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार घारगांव पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४९/२०२४ भा.द.वी. ३७६ सह बालकांचे लैंगिक अपराधांपासुन संरक्षण २०१२ चे कलम ४,८,१२ नुसार शुक्रवार दि 16 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अनिकेत नवनाथ भुजबळ यांस पोलीसांनी अटक केली असून त्याला न्यायालयात न्यायालयात हजर केले असता मंगळवार दि 20 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास घारगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे हे करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!