पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : आपले पूर्ण जीवनभर सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी व आदिवासी समाजासाठी ज्यांनी काम केले असे पारनेर तालुक्याचे भाग्यविधाते स्व. माजी आमदार वसंतराव झावरे पाटील यांचे आठवे पुण्यस्मरण मंगळवार दि. २० रोजी त्यांच्या मूळ गावी वासुंदे येथे होणार आहे. या निमित्ताने संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. माजी आमदार वसंतराव झावरे यांनी राजकारणात येण्यापूर्वी भूविकास बँकेमध्ये मॅनेजर म्हणून काम केले. १९७८ नंतर त्यांनी पारनेरच्या राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. १९७९ ते १९९० अशी १२ वर्षे पंचायत समितीचे सभापतीपदी त्यांनी काम केले.
पारनेर पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यात कार्यकर्त्यांचा संच निर्माण केला. जिल्हा परिषदेमध्येही अभ्यासू सदस्य म्हणून त्यांचा लौकीक होता. दुष्काळग्रस्त पारनेर तालुक्याला सर्वाधिक पिक विमा मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. जनतेच्या पाठींब्यावर १९९५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले. २००५ पर्यंत ते पारनेरचे आमदार होते. पारनेर तालुका सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी पिंपळगावजोगे, काळू, सावरगाव, भांडगाव लघुप्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तत्कालिन केंद्रीय संरक्षणमंत्री शरद पवार यांच्या कार्यकाळात के के रेंजच्या विस्तारीकरणाला त्यांनी स्थगिती मिळवली होती. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेकांना नोकरीची संधी मिळवून दिली.
खेडेगावात शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी पारनेर तालुक्यात भाऊसाहेब महाराज शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना केली. त्यांच्या राजकीय सामाजिक विचारांचा वारसा त्यांचे सुपुत्र सुजितराव झावरे पाटील हे आता चालवत आहेत.स्वर्गीय आमदार झावरे पाटील यांच्या ८ व्या पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त व्याख्यानासह तालुक्यातील झावरे गटातील जेष्ठांसह तरुण कार्यकर्त्यांचा सवांद मेळावा आयोजित करण्यात आला आसल्याची माहीती संयोजक समितीकडून देण्यात आली.
वासुंदे (ता. पारनेर) येथील स्वर्गीय माजी आमदार वसंतराव झावरे पाटील सभागृहात (ता.२०) रोजी सकाळी १० वाजता प्रतिमा पूजन झाल्यानंतर प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांचे ‘आयुष्यावर कसे जगावे’ या विषयावर व्याख्यान होईल. यानंतर कै. झावरे यांच्यासोबत सार्वजनिक जीवनात काम केलेल्या तालुक्यातील सर्व सहकाऱ्यांचा स्नेहमेळावा होईल
माजी आमदार कै. वसंतराव झावरे पाटील यांना तालुक्यात माननाऱ्या कार्यकत्यांचे जाळे मोठ्या संख्येत आहे. ते आजही तसेच स्वतंत्र आहेत. त्यांच्यासोबत काम करणारे जेष्ठ मंडळी व तालुक्यातील झावरे गटातील तरुण कार्यकत्यांनी सवांद मेळाव्यास मोठ्या संख्येत उपस्थित रहावे, असे आवाहन अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील व श्री. भाऊसाहेब महाराज शिक्षण संस्थेचे सचिव सुदेश झावरे पाटील व देवकृपा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
स्व. आमदार वसंतराव झावरे यांचे आज आठवे पुण्यस्मरण!, वासुंदे येथे संवाद मेळाव्याचे आयोजन

0Share
Leave a reply