राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : राहुरी खुर्द येथील शिवधर्म प्रतिष्ठान यांच्याकडून शिव जयंतीचे औचित्य साधून दि.१९/०२/२०२४ अखंड वसुंधरेचे स्फूर्तीदाता युगप्रवर्तक युगपुरुष लोक कल्याणकारी राजे राजे शिवछत्रपतीं यांच्या जयंती उत्सव निमित्ताने समाज उपयोगी काम करत गोरक्षनाथ गड येथील गोशाळेला २ टन चारा वाटपाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यातुन शिव जयंती निमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून गो रक्षण व गो संवर्धना चा संदेश समाजा पुढे ठेवला व सर्व समाजा पुढे एक आदर्श उभा केला.
याप्रसंगी शिवधर्म प्रतिष्ठान चे निखिल चौभारे, अमोल जाधव, सोनु पुंधार, सौरभ चांदणे, लक्ष्मण धोत्रे, युवराज तोडमल, राम कदम, सुशील तोडमल, भरत गायकवाड, अक्षय दारकुंडे, रिच सराफ, गणेश रहाणे, प्रशांत पानसंबळ, राहुल थीटे, वरद माने, शंतनु घोरपडे, हर्ष पालवे, सिद्धार्थ डोळस, शुभम मेहेत्रे, गणेश भडांगे, रोहन विनौर, पवन डोळस, शुभम डोळस, ओम नजन, श्रीनाथ शेटे, विशाल शेटे, कुणाल शेटे, ऋवेद पालवे, आकाश पेटारे, संस्कार वाणी, शुभम परदेशी, प्रितम जाधव, सुदर्शन दातिर,हरि पवार, सुरज गुलदगड, चेतन चांदणे, पुष्पक बनपट्टे आदि सन्माननीय सदस्य उपस्थित होते.त्यानंतर श्री शिव छत्रपतींच्या मुर्तीचे मुर्ती पुजन व भव्य आरती श्री.ज्ञानेश्वर (माऊली) विखे, सचिन दादा म्हसे, धीरज भैय्या पानसंबळ, नरेंद्र दादा शेटे, बंडु घोरपडे ओमकार खेवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
धीरज पानसंबळ, सचिन दादा म्हसे, ह.भ.प दिलीप महाराज क्षीरसागर या सर्वच प्रमुख उपस्थितांनी श्री शिवधर्म प्रतिष्ठानचे या कार्याबद्दल व उपक्रमाबद्दल प्रशंसा व्यक्त केली. या प्रसंगी मच्छिंद्र नाना पाटोळे, निसार भाई शेख, राजु भांड, भाऊ जाधव, साईनाथ भिसे, अमोल डोळस, प्रशांत डोळस, राहुल पाटोळे, सचिन शिंदे, अशोक शेटे, विजय पालवे, पिंटु गिरासे, प्रशांत चोपडे या सर्व ग्रामस्थांच्या उपस्थित पार पडला. या पुढे ही शिवधर्म प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवनवीन सामाजीक उपक्रम राबवावे या साठी मार्गदर्शन पररुपी शुभेच्छा दिल्या
शिव जयंती निमित्त शिवधर्म प्रतिष्ठान राहुरी खुर्द यांच्याकडून गोशाळेला २ टन चारा देऊन राबविला सामाजिक उपक्रम,

0Share
Leave a reply