नगर प्रतिनिधी / जितू शिंदे : अहमदनगर शहरातील बहुचर्चित नगर अर्बन बँक च्या घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे डी.वाय.एस.पी संदीप मिटके यांनी नगर अर्बन बँक मुख्य कर्ज तपासणी अधिकारी आरोपी मनोज वसंतलाल फिरोदिया व कर्जदार प्रविण सुरेश लहारे याला आज अटक केली. नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणातील आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्याने तपासाला योग्य दिशा मिळाली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेचे नव्याने पदभार घेतलेले पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी ही धडाकेबाज कारवाई केली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, सहाय्य्क पोलीस निरीक्षक दिवटे , पोहेकॉ गाडीलकर, पोहेकॉ जंबे, पोना घोडके, पोकॉ क्षीरसागर यांनी केली आहे.
नगर अर्बन बँक घोटाळा मधील मुख्य कर्ज तपासणी अधिकारी मनोज फिरोदिया व कर्जदार प्रवीण लहारे याला अटक, डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई

0Share
Leave a reply