राहुरी प्रतिनिधी / शेख युनूस : राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण येथील जलजीवन कामासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून गांव आणि वाडी वस्तीवर स्वच्छ आणि आरोग्यदायी पाणी पिण्यासाठी हर घर नल योजना सुरु असून येथील जलजीवन योजनेचा बट्याबोळ झालेला असून निकृष्ट दर्जाचे काम होताना दिसत आहे.
सविस्तर माहिती अशी की, केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांच्या हर घर नल योजनाच्या माध्यमातून प्रत्येक घरी स्वच्छ आणि आरोग्यदायी पाणी योजनेचे निधी मोठया प्रमाणावर उपलब्ध झालेला असून संपूर्ण भारतात जलजीवन योजनेची अंबलबजावणी सुरु आहे परंतु यात काही मुजोर ठेकेदार आपलीमनमानी कारभार करून कायमस्वरूपची असलेली जलजीवन योजना ही अतिशय निकृष्ट दर्जाची करत असून कमी प्रतीचे सिमेंट, वाळू, खडी, स्टील आणि झालेल्या कामावर पाणी कमी मारले जात असून कामाची पाहणी केली असता अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून आले असता गावातील नागरिकांनी जलजीवन कामा विषयी नाराजी व्यक्त केली आहे.
शेरी चिखलठाण येथील अनेक आदिवासी, वाड्या, वस्त्या ह्या , रस्ते, दिवे, घरकुल आदी सोय सुविधा पासून वंचित राहिलेले आहे आणि आता सुरु असलेले जलजीवन चे काम हे निकृष्ट असून कामाचे आयुष्य हे कमी असेल तरी निकृष्ट कामाची चौकशी करून प्रत्येक वाडी वस्तीवरील टाक्याचे काम परिपक्क आणि मजबूत टिकणारे करावे अशी अपेक्षा शेरी चिखलठाण येथील आदिवासी भागातून होत आहे.
शेरी चिखलठाण येथील जलजीवनचे काम निकृष्ट दर्जाचे, आदिवासी भागात मुजोर ठेकेदारचा मनमानी कारभार

0Share
Leave a reply