राहुरी / शेख युनूस : संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये शिवजयंती उत्सव मोठ्या दिमाखामध्ये साजरा केला जातो त्याच पद्धतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते त्याच पद्धतीने चिखलठाण येथे शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामाटा मध्ये साजरा करण्यात आला. चिखलठाण येथील सर्व तरुण आणि महिलांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहीर शशिकांत विधाटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा सादर केला डफा च्या तालावर पोवाडा सादर होताना चिखलठाण येथील नागरिक मंत्रमुग्ध झाले होते यानंतर महिलांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्राध्यापक मनोज ओहोळ सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले रिद्धी डोलनर हिने अतिशय उत्कृष्ट छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती नागरिकांना सांगितली त्याचबरोबर डीजे न लावता मिरवणूक न काढता स्त्रियांचा आदर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने केला त्यांचेच विचार आज समाजामध्ये पेरणे गरजेचे आहे अशी अपेक्षा रिद्धी हिने व्यक्त केली माता जिजाऊ बद्दल प्रगती काळनर हिने मनोगत व्यक्त केले.
ओहोळ सर मनोगत सुरू करत असताना सर्व महामानवांचा उल्लेख करून अभिवादन केले त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची वेळोवेळी ज्या पद्धतीने बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो त्यांचा खरा इतिहास लपवला जातो यासाठी लढा उभारणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जनतेसाठी उपलब्ध करण्यासाठी भरीव काम करणे गरजेचे आहे आज समाजामध्ये देशामध्ये जाती धर्माच्या नावावर तेढ निर्माण करून देशाला कमजोर करण्याचे काम राजकारणी करत आहेत यासाठी आपण महापुरुषांचे विचार घेऊन आपल्या जीवनामध्ये अंगीकृत करणे गरजेचे आहे अशी अपेक्षा ओहोळ सरांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी वर्पे सर, सोमवते सर, पत्रकार जमीर सय्यद,पत्रकार युनूस शेख, स्वप्नील दिघे,भाऊसाहेब काळनर, ताराबाई डोलनर, साखरबाई काळनर, अनिता काळनर, मंगल गायकवाड, आयेशा सय्यद,किंजल टेमकर, तुकाराम पिंपळे, धीरज टेमकर, महादू काळनर, वामन काळनर, नामदेव गायकवाड, शिवाजी काळनर, सतीश भोसले, रंगनाथ काकडे, संपत काळनर,अमोल बागुल, कॉमेड शरद बागुल, सुभाष बाचकर, नितीन भोसले,विनोद काकडे, भारत काळनर, आदिक डोलनर, आण्णा बाचकर, आक्का तमनर,आदी ग्रामस्थ उपस्थित होते सूत्रसंचालन आबासाहेब काळनर यांनी केले आभार संतोष काळनर यांनी मानले.
Leave a reply