Disha Shakti

राजकीय

छावा ब्रिगेडच्या वतीने अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी जाहीर…

Spread the love

प्रतिनिधी / विठ्ठल ठोंबरे : छावा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष मा.विश्वनाथ वाघ यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेश महासचिव श्री राहुल रेळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब वाघ व राजाराम शिंदे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष,राजुभाऊ वाणी उत्तर जिल्हा अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थित वाळकी ता.जि. अहमदनगर येथे पद नियुक्ती चा कार्यक्रम घेण्यात आला.यामध्ये मेजर राम भालसिंग यांची दक्षिण जिल्हा अध्यक्ष,भाऊसाहेब दहे पाटिल यांची उत्तर जिल्हा उपाध्यक्ष,गणेश गोंळेकर प्रदेश अध्यक्ष विद्यार्थी आघाडी पदी निवड करण्यात आली.

यावेळी त्यांना छावा ब्रिगेड चे अध्यक्ष विश्वनाथ वाघ यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.विश्वनाथ वाघ यांचा सभापती श्री भाऊसाहेब बोठे गावचे सरपंच श्री शरद भाऊ बोठे व पंचायत समिती उपसभापती मा.रंगनाथजी निमसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्यावेळी गावचे सरपंच श्री शरद भाऊ बोठे म्हणाले की आमच्या गावचे श्री राम भालसिंग यांना जी छावा ब्रिगेड चे अध्यक्ष विश्वनाथ वाघ यांनी जी काम करण्याची संधी दिली त्यासाठी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच पंचायत समिती उपसभापती मा.रंगनाथजी निमसे यांनी आभार मानले.

यावेळी छावा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष मा.विश्वनाथ वाघ गावचे सरपंच श्री शरद भाऊ बोठे पंचायत समिती उपसभापती मा.रंगनाथजी निमसे ग्रामपंचायत सदस्य श्री विठ्ठल तात्या कासार,प्रितम म्हस्के,अशोक बोठे गणेश धोंड, विठ्ठल सुपेकर, भारतीय जनता पार्टी ग्राम पंचायत सदस्य श्री सचिन बोठे,गणेश भालसिंग,अंबादास भालसिंग,वाळकी विविध सोसायटी चे चेअरमन चंदा बापु बोठे सदस्य श्री गणेश धोंड, रमेश धोंडे,सोपान कासार,विठ्ठल भालसिंग,उद्योगजोक शरद कासार,संदिप बोठे,विकास कासार,राजाभाऊ म्हस्के, राजु मुरुमकर, अरुण कासार, संदिप भालसिंग, भाऊसाहेब दहे, राजाराम शिंदे,राजु वाणी, ग्राम पंचायत सदस्य मा.किशोर भालसिंग, ओंकार निमसे, प्रकाश जासुद,अविनाश बोठे,विशाल बोठे,पत्रकार ज्ञानदेव गोरे, तुषार कासार,आकाश कासार, बाळासाहेब कासार,उदय बोठे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!