प्रतिनिधी / विठ्ठल ठोंबरे : म.वि.प्र.समाज संचलित आदर्श इंग्लिश मेडियम स्कूल सटाणा या शाळेत अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत व स्मृति स्थान छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवरायांची वेशभूषा शाळेतील शिक्षक श्री.अविनाश वाघ तसेच जिजाऊंची वेशभूषा शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीम.सारिका कदम* यांनी साकारली. शाळेतील बरेच विद्यार्थी विविध वेशभूषेत आलेले होते. त्यांचे ढोल ताशाच्या,फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले.
शिवछत्रपती शिवरायांची वेशभूषा परिधान केलेले राजे घोड्यावर स्वार होऊन सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांसोबत प्रभात फेरी काढण्यात आली. सटाणा येथील शिवतीर्थावर जाऊन शिवरायांचे दर्शन घेण्यात आले.शाळेत परत आल्यावर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.वैशाली सोनवणे यांनी शिवरायांचे व जिजाऊंचे औक्षण केले तसेच फुलांच्या वर्षावाने विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले.शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून छत्रपती शिवरायांची आरती करण्यात आली. इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशी नाटिका सादर केली. त्या नाटिकेवरून इतिहासाच्या काही घटनांना उजाळा मिळाला. इयत्ता नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध पोवाडे, भारुडे, गीत, नृत्य तसेच उत्कृष्ट भाषण सादर केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.योगेश बोरसे सर यांनी केले व आभार प्रदर्शन श्रीम.वैशाली सावंत यांनी केले.हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक महाले अश्विनी,कुवर रूपाली, भामरे जयश्री, सावंत वैशाली, निकम श्रद्धा, सोनवणे दिपाली, जाधव अर्चना, जाधव दीपक, अहिरे दिनेश, देवरे प्रियंका, अहिरे माधुरी, भामरे निकिता, विरगावकर पुनम, कल्याणी सोनवणे, भामरे सपना, जाधव मोनिका, देवरे उमेश, जाधव वैष्णवी तसेच शाळेतील क्लर्क बिरारी रवींद्र, शिक्षकेतर कर्मचारी रोहिदास सोनवणे, प्रवीण कोर, नरेंद्र अहिरे, निलेश थोरात, पवार पवन, निकम ललिता, जाधव सोनाली, सोनवणे अमोल या सर्वांनी कार्यक्रम उत्कृष्ट पद्धतीने पार पाडण्यासाठी मोलाचा हातभार लावला.
Leave a reply