पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : वडगाव सावताळ येथील भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते शिवाजी रोकडे यांची नुकतीच भाजपा किसान मोर्चाच्या अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली. या निवडीबद्दल नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी रोकडे यांचा सन्मान केला व भारतीय जनता पार्टीचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी शुभेच्छा दिल्या. पारनेर तालुक्याचे नेते मोहन रोकडे यांचे शिवाजी रोकडे हे लहान बंधू आहे. रोकडे परिवार पारनेर तालुक्याच्या उत्तर भागांमध्ये राजकारणात समाजकारणात अनेक दिवसापासून सक्रिय आहे. शिवाजी रोकडे हे अनेक दिवसापासून भाजपा पक्षांमध्ये सक्रिय सदस्य म्हणून काम करत आहेत वडगाव सावता सारख्या ग्रामीण भागामध्ये त्यांनी पक्षाचे मोठे काम उभे केले आहे.
अतिशय उत्कृष्ट संघटन कौशल्य असलेला नेता म्हणून त्यांना परिसरामध्ये ओळखले जाते. शिवाजी रोकडे यांचा पारनेर तालुक्याच्या उत्तर भागामध्ये मोठा जनसंपर्क आहे. वडगाव सावताळ सारख्या आदिवासी ग्रामीण भागामध्ये शिवाजी रोकडे हे भाजप पक्षाचे करत असलेले काम त्यामुळेच त्यांना जिल्हा पातळीवर काम करण्याची संधी मिळाली व पक्षाने दखल घेत त्यांना भाजपा किसान मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली शेतकरी कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी शिवाजी रोकडे यापुढील काळात नक्कीच काम करतील.
रोकडे हे खासदार डॉ. सुजय विखे यांचे कट्टर समर्थक म्हणून सध्या पारनेर तालुक्यात ओळखले जातात. भाजपा पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील, काशिनाथ दाते सर, विश्वनाथ दादा कोरडे, दत्ता नाना पवार , पंकज कारखिले, वसंतराव चेडे, अश्विनीताई थोरात, सचिन पाटील वराळ, शिवाजी खिलारी यांच्या नेतृत्वाखाली ते सक्रियपणे काम करत आहेत.
यावेळी खासदार सुजय विखे म्हणाले शिवाजी रोकडे हे उत्तम संघटन कौशल्य असलेल्या कार्यकर्ता आहे. भाजप पक्षांनी अशा कार्यकर्त्यांची दखल घेऊन त्यांना जिल्हास्तरावर काम करण्याची संधी दिली निश्चितच असे कार्यकर्ते या संधीचं सोनं करतील आणि पक्षाला बळकटी देतील यात आता तीळ मात्र शंका राहिलेली नाही.
यावेळी शिवाजी रोकडे म्हणाले खासदार सुजय विखे पाटील यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये विकासाचा डोंगर उभा केला आहे. त्यांच्या माध्यमातून काम करत असताना आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना उत्साह येतो. भाजप पक्षाला आता यापुढील काळात आणखीन प्रबळ बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे व खासदार सुजय विखे पाटील यांना लोकसभेला जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्राणपणाने यापुढील काळात काम करणार असल्याचे रोकडे यांनी माध्यम प्रतिनिधींना बोलताना सांगितले आहे.जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिवाजी रोकडे यांचा खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते टाकळी ढोकेश्वर येथे सत्कार व सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी सभापती काशिनाथ दाते, तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, दै. नगर सह्याद्रीचे संपादक शिवाजी शिर्के, वसंतराव चेडे, बाबासाहेब खिलारी, विकास रोहकले, विश्वनाथ कोरडे, गणेश शेळके, दत्तात्रय पवार दादाभाऊ वारे, सरपंच लहु भालेकर, डॉ. भाऊसाहेब खिलारी, पंकज कारखिले, विलास झावरे, नारायण झावरे, शिवाजी खिलारी, कारभारी आहेर, अंजनाताई बांडे, गोकुळ वाळुंज, जयश्री उदावंत, किसन धुमाळ, दिपक गुंजाळ, दिलीप उदावंत यांच्या सह पारनेर तालुका भाजपा पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने टाकळी ढोकेश्वर येथे उपस्थित होते.
Leave a reply