Disha Shakti

क्राईम

पळवुन नेलेल्या 3 अल्पवयीन मुलींचा पुणे सांगली व मुंबई येथून शोध, दोन मुख्य आरोपी व गुन्ह्यात मदत करणाऱ्या आरोपीच्या आईस अटक

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / युनूस शेख : राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतून दिनांक 6/11/2021 रोजी सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीस कुणीतरी अज्ञात इस्माने पळवून नेल्याबाबत गुरन 465/21 भादवि कलम 363 अन्वये 6/11/2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्हामध्ये भारतीय दंड विधान सहिता कलम 366 अ वाढविण्यात आलेले आहे. सदर गुन्हातील पीडीतेचा व पिडीतेस पळवून नेणाऱ्या आरोपीचा तांत्रिक विश्लेषण आधारे शोध घेतला असता सदर पीडितेस आरोपी नामे अजय बाळू शिरोळे वय पंचवीस वर्षे राहणार दिग्रस तालुका राहुरी याने हडपसर पुणे येथे पळून नेलेले असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचे ताब्यातून दिनांक 21/2/2024 रोजी हडपसर पुणे येथे डांबून ठेवलेल्या भाड्याच्या खोलीतून सदर पीडितेस मुक्त केले. तसेच नमूद आरोपीस गुन्ह्याच्या तपास कामी ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक खोंडे चारुदत्त, पोलीस शिपाई प्रमोद ढाकणे , अंकुश भोसले, सहाय्यक फौजदार औटी, पोलीस नाईक गणेश सानप, पोलीस शिपाई नवले, पोलीस शिपाई थोरात यांनी केली.

2) राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील ब्राह्मणी येथून दिनांक 23/4/2023 रोजी पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीस कुणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याबाबत पीडीतेच्या पालकांच्या तक्रारीवरून गु र न 425/ 23 भादंवि कलम 363 ,366 अ दाखल असून दाखल गुन्ह्याच्या तांत्रिक विश्लेषणाधारे सदर पीडितेस सांगली येथे पळवून नेलेले असल्याचे निष्पन्न झाल्याने सहाय्यक फौजदार चंद्रकांत बऱ्हाटे व पोलीस हवालदार आजिनाथ पालवे यांनी सदर पीडितेची आरोपी नामे सुनील सहदेव सूर्यवंशी राहणार ब्राह्मणी यांच्या ताब्यातून सांगली येथून सुटका केली. सदर पीडितेस पालकांच्या ताब्यात देऊन ऑफिस गुन्ह्याच्या तपास कामी अटक करण्यात आलेले आहे. सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे ,चंद्रकांत बोराटे ,वाल्मीक पारधी, आजिनाथ पालवे, सुनील निकम , अंकुश भोसले, रोहिदास नवगिरे, सतीश कुराडे यांच्या पथकाने केली.

3) राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील राहुरी खुर्द येथून दिनांक 4/1/ 2024 रोजी सतरा वर्षी अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले असल्याबाबत तिची आई ने फिर्याद दिल्याने गुरन 9/2024 भादवी कलम 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्ह्याचा तांत्रिक विश्लेषण आधारे सदर मुलगी ही मुंबई येथे असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने तिचा ए एसआय आव्हाड एकनाथ यांनी दिनांक 21/2/2024 रोजी शोध घेऊन तीस तिचे आईचे ताब्यात देण्यात आलेले आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आव्हाड करत आहेत. सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त कोंडे सहायक फौजदार एकनाथ आव्हाड पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब शिरसाट यांच्या पथकाने केली.

4) राहुरी पोलीस स्टेशन गु र न 129/22 भारतीय दंड विधानसभेचा कलम 363 366 या गुन्ह्यात पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेण्यासाठी सहाय्य करणारी आरोपी ची आई नामे शोभा संपत लावरे वय 48 वर्षे हिस काल दिनांक 20/2/2024 रोजी अटक केली असून मान्य न्यायालयाने तिचा 22/02/2024 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पारधी करत आहे. तपासा दरम्यान अटक आईच्या साह्याने आरोपी संदीप संपत लावरे व पिडीतेचा शोध घेत आहे.

सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब यांचे ऑपरेशन मुस्कान संकल्पनेतून व मार्गदर्शनातून ,तसेच अप्पर पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे , विभागीय पोलीस अधिकारी डॉ श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात लेखनिक हवालदार साळवे, कार्यालयीन लेखनिक पाखरे, अमोल गायकवाड , सम्राट गायकवाड,अशोक शिंदे, रोहकले ,राहुल यादव, सुरज गायकवाड, नदीम शेख, प्रवीण बागुल यांनी तांत्रिक विश्लेषण आधारे केलेली आहे. अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणे तथा लैंगिक अत्याचार करणे अशा गुन्ह्यात कुणाकडून अनवधानाने सहकार्य /मदत झाली असल्यास वा कुणास अशा प्रकारच्या गुन्ह्याबाबत माहिती असल्यास त्यांनी सदर माहिती पोलिसांना पुरवावी. त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!