बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार (कासराळीकर ) : बिलोली तालुक्यातील मौजे-अर्जापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह पंचदिवसीय सोहळा व श्रीमहालक्ष्मी प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. अखंड हरिनाम सप्ताह मधे 17. 02.24 रोजी ह.भ.प व्यंकट महाराज गुळवे अंबुलगेकर, 18.02.24 रोजी ह.भ.प रामकिशन महाराज नरसीकर, 19.02.24 रोजी ह.भ.प श्रीधर महाराज कासराळीकर, 20.02.24 रोजी हरिभक्त भगवान महाराज मुगावकर, 21.02. 24 रोजी ह.भ.प रामकिशन महाराज यांचे काल्याच्या कीर्तनाने हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आले.
अर्जापूर गावामध्ये मुख्य रस्त्यातून महालक्ष्मी मातेचे भव्य शोभारात्रा काढून ढोल ताशांच्या गजरामध्ये फटाक्यांची आतिश बाजी करत महिलांनी डोक्यावर कलश घेऊन मोठ्या उत्साहात शोभायात्रा शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये अबालवृध्द, महिला भगिनी, पुरुष बांधव, तरूण युवकांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. शोभायात्रेत नंतर महाराजांच्या मंत्र उच्चारांनी महालक्ष्मी मातेच्या मूर्तीची विधिवत प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये लोकवर्गणीतून दानशूर व्यक्तीचा माध्यमातून महालक्ष्मी मंदिराची स्थापना करण्यात आली असून गावातील व परिसरातील भाविकांनी मातेच्या दर्शनासाठी यावे असे आवाहन ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.
सदरील कार्यक्रमासाठी कुंडलवाडी येथील प्रतिष्ठित व्यापारी साईनाथ शेठ उत्तरवार, दत्तासेठ र्याकावार, भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रशेखर पाटील सावळीकर, कासराळीचे माजी सरपंच अरविंद ठक्करवाड, भाजपा ओबीसी जिल्हा सरचिटणीस आबारावजी संगनोड, तसेच अर्जापूरचे माजी सरपंच शिवाजीराव पोरडवाड, जिल्हा सरचिटणीस अनुसूचित जमाती साईनाथ शेट्टीवार आदींनी प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रसंगी उपस्थितीती होती. यावेळी मंदीर कमिटीच्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने आलेल्या मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
अर्जापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह पंचदिवस सोहळा व महालक्ष्मी प्राणप्रतिष्ठापना संपन्न

0Share
Leave a reply