शेख युनूस / अहमदनगर : राष्ट्रीय घरकामगार चळवळ आणि महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समितीच्या वतीने राज्यातील ४५ लाख घरेलू कामगार संपावर जाणार असल्याचा इशारा राहुरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत संदीप कोकाटे यांनी दिला आहे. राज्यातील ४५ लाख घरेलू कामगारांना श्रमिक म्हणून दर्जा मिळावा, सामाजिक सुरक्षा व इतर अधिकार मिळावेत यासाठी वेळोवेळी आंदोलन केले. मात्र सरकारने फक्त आश्वासन देऊन बोळवण केली कोविड काळात घरेलू कामगारांना त्यांचा काम करण्याचा अधिकारच नाकारला गेला होता. कोविड सारख्या या महामारीने कामगारांना सामाजिक सुरक्षेचे महत्त्व त्यांचे श्रमिक म्हणून हक्क काय याची चांगलीच जाणीव करून दिली त्या जाणिवेच्या आधारावर घरेलू कामगारांचा लढा नव्याने उभा राहत असल्याने सरकारने गांभीर्याने विचार करावा असे महाराष्ट्र राज्य सचिव वर्षाताई बाचकर यांनी सांगितले. या क्षेत्रात आर्थिक सामाजिक लैंगिक शोषण मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने शासनाने त्याची दखल घेऊन त्याच्या निर्मूलनासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे असे संदीप कोकाटे यांनी म्हटले आहे.
घरेलू कामगारांचा रोजगार या नावाने अनुसूचित रोजगाराच्या अनुसूची एक मध्ये समाविष्ट करत अशी अधिसूचना शासनाने निर्गमित केली होती आणि त्याच्या अंतिम अधिसूचनेचा मसुदा सादर केला होता पण रोजगाराची अंतिम सूचना अजून प्रसिद्ध झालेली नाही. घरेलू कामगारांचा जाहीरनामा पत्रकार परिषदेत प्रसिद्ध करण्यात आला. जाहीरनाम्यात प्रामुख्याने घरेलू कामगारांना सन्मानाने जगण्याबाबत सामाजिक सुरक्षा अधिकार म्हणजे पेन्शन, आरोग्य विमा योजना, मुलांच्या शिक्षणाकरिता सहाय्य, किमान वेतन इत्यादी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लढा करण्याचा व त्याबरोबरच एकात्मता बंधुभाव व लोकशाहीच्या रक्षणासाठी वचनबद्ध राहण्याचा निर्धार करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेत अल्मास पठाण, रेश्मा शेख, प्रियंका मेहत्रे, सणा शेख यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
Leave a reply