प्रतिनिधी / शेख युनूस : राहुरी – नगर – पाथर्डी संघांचे लोकप्रिय माजी राज्य मंत्री आणि आमदार श्री.प्राजक्त दादा तनपुरे यांच्या विशेष प्रयत्नातून राहुरी तालुक्यातील चिखलठाण गावाकरिता १० लक्ष रुपयांचा विविध विकास कामाचे भूमिपूजन समारंभ हे डॉ.सौ. उषाताई तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. चिखलठाण येथे विविध विकास ही माजी राज्य मंत्री व आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांच्या विशेष प्रयत्नातून भरीव कामे झालेली आहे. शुक्रवार दि.२३ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ वाजता म्हस्कोबा मंदिर येथे सभा मंडप बांधकाम कामाचे भूमिपूजन समारंभ करण्यात आले.
चिखलठाण येथील श्री. नाथ म्हस्कोबा हे जागृत देवस्थान असून या ठिकाणी जिल्ह्यातून भक्त, भाविक येतात. दरसाल दरवर्षी या मंदिरात दोन वेळेस श्री. नाथ म्हस्कोबा यात्रा आयोजित करण्यात येते. . यावर्षीही श्री. नाथ म्हस्कोबा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता, तत्पूर्वी माजी राज्य मंत्री व आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भाविक भक्ताना निवासासाठी आणि उपस्थित नागरिकांसाठी १० लाख रुपयांचे सभा मंडप आपल्या निधीतून मंजूर केले असून या भव्य दिव्य सभा मंडपाचे उदघाटन डॉ. सौ. उषाताई तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. उषाताई तनपुरे यांचा सत्कार चिखलठाण येथील महिला भगिनींच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पंचक्रोशीतील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. . . यावेळी माने भगत बाबा, आबासाहेब काळनर,भास्कर राव काळनर,विजय डोमाळे, रामा माने, किसन काळनर, आनंदा डोमाळे, विजय बाचकर, इसाक सय्यद, महंमद भाई शेख, विनोद काळनर,नारायण डोमाळे, सुषमा डोमाळे मॅडम,मनीषा डोमाळे मॅडम,बिस्मिल्ला शेख मॅडम,वाल्हा बाई, ताई आक्का आदी महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.
डॉ.सौ.उषाताई तनपुरे यांच्या शुभहस्ते चिखलठाण येथील म्हसकोबा मंदिर सभामंडप व इतर विविध विकास कामांचे भूमिपूजन

0Share
Leave a reply