प्रतिनिधी / शेख युनूस : जिल्हा वार्षिक योजना २०२३.२४ अंतर्गत पालक मंत्री महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे व खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि जिल्हा परिषद च्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून डिजिटल स्कूल संकल्पना अंतर्गत सुमारे तीन लाख रु चा इंटर ऍक्टिव्ह डिजिटल फ्लॅट पॅनल बोर्ड संगमनेर तालुक्यातील सुमारे २९ शाळांना देण्यात आला.
साकुर गटातील साकुर,खांबे, वरवंडी, अशा ३ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना इंटर ऍक्टिव्ह डिजिटल फ्लॅट पॅनल बोर्ड देण्यात आले असून या डिजिटल बोर्डाचे उदघाटन जि. प. च्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या हस्ते करण्यात आले.माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी शाळेतील विदयार्थ्यांची संवाद साधला. शाळेला डिजिटल बोर्ड मिळाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चिमुकल्या चेहऱ्यावर हसू उमटले.
यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शालिनीताई विखे, महिला आघाडीच्या सोनाली नाईकवाडी, भाजपा कार्यकारिणी सचिव सौ. प्रियांकाताई जाधव, अनिताताई कोळपकर,भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश कार्यकारिनी सदस्य रऊफ भाई शेख, बाळासाहेब खेमनर, उपसरपंच दादा पटेल, भीमराज जाधव, सामाजिक कार्यकर्ते सुनील विघे, विकास पवार, एकनाथ खेमनर, सुभाष खेमनर, बंडू खेमनर, मुस्लिम जमात ट्रस्टचे अध्यक्ष इसाक पटेल, बुवाजी खेमनर, ओ बी सी मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष सुभाष भुजबळ, अल्पसंख्यांक मोर्चाचे तालुकाध्यक्ष मन्सूर पटेल, गुलाबराजे भोसले, एकनाथ पाटील वर्पे, खांबा सरपंच रवींद्र दातीर पत्रकार किरणपुरी , पत्रकार सहदेव जी जाधव साहेब, पत्रकार युनूस शेख, आणि साकुर पंचक्रोशीतील महिला भगिनी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने संगमनेर तालुक्यातील सुमारे २९ शाळांना डिजिटल बोर्डचे वाटप

0Share
Leave a reply