Disha Shakti

सामाजिक

काव्यप्रेमी मंच नागपूर गझल कार्यशाळा व कविसंमेलन उत्साहात संपन्न 

Spread the love

राहुरी तालुका प्रतिनिधी / जावेद शेख : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे (प्रादेशिक कार्यालय नागपूर) आणि काव्यप्रेमी शिक्षक मंच नागपूर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गझल कार्यशाळा व कविसंमेलन डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज न्याय भवन समाज कल्याण विभाग सी विंग. डोम येथे पार पडले. या कार्यक्रमाला डॉ. सिद्धार्थ गायकवाड (प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण विभाग), यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

छत्रपती शिवरायांच्या आणि फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेनी समाजाची प्रगती होईल. या विचारांनी आपण सर्वांनी पुढे जाण्याची गरज आहे हे विचार विचारपिठावर व्यक्त केले. उद्घाटन वेळी प्रमुख अतिथी म्हणून अनिल वाळके (सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक बार्टी ) आणि दैनिक बहुजन सौरभच्या संपादक संध्या राजूरकर तसेच काव्यप्रेमी शिक्षक मंचचे राज्यसचिव कालिदास चवडेकर.आणि नागपूरचे गझलकार अझीझ खान पठाण होते. तसेच प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले उपस्थित पाहुणे होते. डॉ सिद्धार्ध गायकवाड यांच्या हस्ते काव्यप्रेमी नागपूर जिल्हा उपक्रम संयोजक अपर्णा कल्लावार, अर्चना कोहळे आणि डॉ गीता वाळके आणि कार्यक्रम संयोजिका रेखा सोनारे यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर जिल्हाध्यक्ष निशा खापरे यांच्या मार्गदर्शनाने समूहातील ५०० साहित्यिक उपक्रम आतापर्यंत राबविले गेले त्या यशस्वितेसाठी संपूर्ण कार्यकारणीने त्यांचा सत्कार केला.

अनिल वाळके सरांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक वाचन सिंधू बोदेले यांनी केले स्वागत गीत दिपाली ढवस यांनी सादर केले तर कार्यक्रमाचे प्रास्तविक अपर्णा कल्लावार यांनी सादर केले. कविसंमेलनाच्या अध्यक्षा डाॅ.स्मिता मेहेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन संपन्न झाले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या विजया धोटे अध्यक्षा काव्यप्रेमी नागपूर विभाग कविता कठाणे व निरज आत्राम ( उपाध्यक्ष, काव्यप्रेमी नागपूर विभाग) उपस्थित होते. काव्यप्रेमी शिक्षक मंच नागपूर जिल्ह्याच्या अध्यक्ष निशा खापरे यांच्या नियोजनानी हा कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर नेऊन यशस्वी झाला. सुरूवातीलाच मा.कालीदास चवडेकर सर व अझीझ खान पठाण सर यांनी घेण्यात आलेल्या गझल कार्यशाळेमध्ये सर्वांना गझल म्हणजे काय? गझल लिहितांना घ्यावयाची काळजी ? मतला, रदीफ, कवाफी, अलामत म्हणजे काय?अक्षरगणवृत, मात्रावृत, लगावली याबाबत भरीव असे मार्गदर्शन केले. प्रत्येकाच्या मनात गझल बाबत ज्या शंका, प्रश्न होते त्यांचे निरसन करून, सर्वांना गझल लेखनासाठी प्रोत्साहित केले.

कार्यक्रमाला उपस्थित सर्वच सन्माननीय कवी, कवयित्री यांनी अतिशय सुंदर प्रकारे कविता व गझलांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल बोढे, अर्चना कोहळे यांनी केले तर आभार प्रदर्शन कोकिळा खोदनकर, डॉ शील बागडे यांनी केले. डॉ स्मिता मेहेत्रे या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या “साहित्य हे परिवर्तनाचे हत्यार आहे” समाजाचे प्रश्न समजून घेऊन साहित्यिकांनी लिखाण करावे असे विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक निशा खापरे संयोजक रेखा सोनारे तसेच नंदकिशोर कदम, अपर्णा कल्लावार, डॉ गीता वाळके, छाया पिंपळे, सुचिता पाटील, सविता धमगाये, सुधाकर भुरके, धर्मराज बोलधने, सुचिता कुनघटकर नंदू कोहळे, दशरथपंत अतकरी, गणेश पांडे, विद्यानंद हुलके, या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला. कविसंमेलनात ४० कवींना पुस्तक, गझल प्रमाणपत्र, गझल नोट्स, पेन देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बार्टी प्रकल्प अधिकारी, बार्टी कर्मचारी, काव्यप्रेमी मंच नागपूरचे सदस्य उपस्थित होते..


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!