Disha Shakti

इतर

कोपरगाव येथे जुने फोटो व्हारयल करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, ती माहिती चुकीची सत्यता वेगळी, आरजेएस कॉलेज व्यवस्थापनाचा खुलासा

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात असलेल्या आर जे एस मेडिकल कॉलेजमध्ये केरळच्या मुस्लिम शिक्षिकेने तेथील विद्यार्थ्यांना बळजबरीने सामूहिक नमाज पठण करण्यास भाग पाडले आणि धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केल्याचं आरोप कोपरगाव शहरातील काही हिंदुत्ववादी नेत्यांनी केला होता.आणि तसे फोटो समाज माध्यमावर वायरल झाले. त्यामुळे कोपरगाव शहरात एकच खळबळ उडाली आणि रात्री मोठ्या प्रमाणात कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला जमाव जमला होता. मात्र मंगळवारी सकाळी आर जे एस मेडिकल कॉलेजच्या व्यवस्थापनाने प्रसिद्धीपत्रकद्वारे खुलासा केला आहे.

     सामूहिक नमाज पठण करतानाचे जे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे त्या संदर्भात माहिती देताना आरजेएस कॉलेज व्यवस्थापनाने म्हटले आहे की,काल कॉलेजच्या ग्राउंड वरती काही मुलांमध्ये खेळता खेळता वाद झाले जो की साहजिक आहे प्रत्येक ग्राउंड वरती या गोष्टी घडतात परंतु एक मुस्लिम मुलगा जो संस्थेशी संबंधित नाही तो बाहेरून आला आणि वादामध्ये त्यांने चाकू काढला त्यामुळे त्वरित सेक्युरिटी इन्चार्ज यांनी त्या मुलाला सर्वांच्या परवानगीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी घेऊन गेले. परंतु तिथे गेल्यानंतर काही मुलांकडून त्याला सामाजिक वळण देण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामध्ये यश येत नाही हे लक्षात आल्यानंतर कॉलेजमध्ये दोन वर्षांपूर्वी मोठा गणेश उत्सव जो महाराष्ट्र राज्यात सर्व धर्मामध्ये आनंदाने साजरा केला जातो त्यामधील सर्वधर्मसमभाव अशी शिकवण विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थेकडून मिळावी म्हणून प्राचार्य डॉक्टर श्रावणी यरनाळकर मॅडम यांनी सर्वधर्मसमभाव या थीमच्या अंतर्गत सर्वांना सर्व समाजाची प्रार्थना करायची अशी इच्छा व्यक्त केली आणि विद्यार्थ्यांनी लागलीच आनंदाने त्यासाठी होकार दिला, परंतु त्यामध्ये वेगवेगळ्या समाजाची प्रार्थना झाल्यानंतर मुस्लिम समाजाची प्रार्थना अर्थात नमाजच्या वेळेसचा एकमेव फोटो हा आज जवळपास दोन ते अडीच वर्षानंतर कालच्या पोलीस स्टेशनच्या प्रकरणाच्या वेळी बाहेर काढण्यात आला आणि त्या फोटोचा आधार घेत ज्या चुकीच्या बातम्या आज आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये अपेक्षित नाही अशा पद्धतीने प्रसिद्ध केल्या जात आहे. आणि विशेष म्हणजे या मेडिकल कॉलेजमध्ये केरळची कोणतीही मुस्लिम शिक्षिका नाही. नर्सिंग कॉलेजमध्ये केरळचे मुस्लिम शिक्षक आहे परंतु त्यांचा या घटनेची कोणताही संबंध नाही.

पण यामध्ये प्रतिष्ठित नागरिकांचे असे मत आहे की जी संस्था कोपरगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये एवढ्या कष्टातून कोणीतरी उभी केली आहे आज जिथे महाराष्ट्रभरातून रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात कॅन्सर वरती एवढ्या अत्याधुनिक उपचार असतील किंवा अनेकही उपचार जे शासनाच्या योजनेअंतर्गत गरीब रुग्णांना मोफत दिले जातात हे सर्व एका दिवसात उभे राहत नाही परंतु चुकीच्या गोष्टी या सोशल मीडिया वरती पाठवले जात आहे.आणि काल संस्थेच्या प्रशासनाने स्वतः पोलीस प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करत एक अर्ज दिला आहे आणि एफ आय आर नोंदवली आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कडक कार्यवाही करावी अशी फिर्याद दिली आहे.

औषधांना धर्म नसतो

ज्या मेडिकल कॉलेजमध्ये सदर प्रकरण घडल्याचे बोलले जात आहे,त्याठिकाणी विद्यार्थ्यांना औषधांसंदर्भाची माहिती आणि उच्च शिक्षण दिले जात आहे. औषधांना कोणताही धर्म नसतो. रुग्ण सेवा करताना डॉक्टर किंवा केमिस्ट कोणाचाही धर्म पाहत नाही एक माणुसकीच्या नात्याने रुग्ण म्हणून त्यांची सेवा केली जाते. त्यामुळे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यां संबंधात अशा प्रकारचे आरोप करणे कितपत योग्य आहे याचाही विचार व्हायला हवा.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!