पारनेर प्रतिनिधी /गंगासागर पोकळे : पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील धन्वंतरी कला व विज्ञान महाविद्यालयात विज्ञान दिनानिमित्त नॅशनल सायन्स डे पोस्टर स्पर्धा, महाविद्यालयाची राष्ट्रीय सेवा योजना व आनंद ऋषीजी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ढवळपुरी येथील डॉक्टर संदीप तांबे,संदीप महांडुळे सर (मुख्याध्यापक. प्राथ. आश्रम शाळा, ढवळपुरी) , कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक जमील शेख सर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष शाहिद काझी सर म्हणाले, धन्वंतरी महाविद्यालय ढवळपुरी सारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देत आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक जमील शेख सर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रा. किरण कारंडे सर यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रम सह अधिकारी प्रा. जयश्री भोंडवे मॅडम, प्रा. कावेरी गवते मॅडम, प्रा. योगेश भुसारी सर, प्रा.अतुल मोरे, प्रा. सागर वाव्हळ ,प्रा. विशाल काळे ,प्रा. राहुल शेलार, प्रा. रोहित जाधव, प्रा.अनिल पवार, शिक्षकेतर कर्मचारी श्री .फारुख राजे, श्री.गणेश देशमुख, अभिजीत किंनकर, श्री. वैभव गावडे, श्री .शुभम गायकवाड ,श्री .मोहित गोरड, प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा ढवळपुरी येथील शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते.
Leave a reply