Disha Shakti

क्राईम

राहुरी तालुक्यातील इलेक्ट्रीक मोटार चोरी करणारी टोळी राहुरी पोलीसाकडुन जेरबंद..

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / युनूस शेख : राहुरी पोलीस ठाणे गुरनं. १३६/२०२४ भादवि कलम ३७९ प्रमाणे दि.९/२/२०२४ रोजी दाखल गुन्हाचे बाबत गोपनीय बातमीदारा मार्फत बातमीच्या आधारे व गुन्हाचे तांत्रिक विष्लेशन करुन नमुद गुन्हातील मुख्य आरोपी नामे १) संतोय सुरेश गोलवड वय १९ रा. सडे ता राहुरी, २) नवनाथ बाबासाहेब पवार वय २४ रा.सडे महादेव वाडी, ३) सार्थक आण्णासाहेब वांडेकर वय १९ रा. पागीरे वस्ती वांबोरी, ४) अभिजीत भागवत कोळसे वय ३२ रा. आंबी ता राहुरी, ५) मयुर भास्कर उंडे वय ३० रा. देवळाली प्रवरा ता राहुरी, यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले आहे. नमुद आरोपी कडे अधिक विचारपुस व चौकशी करीता त्यांनी ९ मोटारी मौजे. सडे, महादेव वाडी, उंबरे व कॅनाल परीसरातून चोरी केल्याची कबुली दिली आहे. नमुद गुन्हयातील चोरी करणारे व चोरीच्या मोटारी घेवून जे स्वत शेतकरी असताना त्या मोटर स्वतः च्या असल्याचे भासवून सदर मोटर अन्य शेतकऱ्यांना विकणारे आरोपी यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाई मा.राकेश ओला पोलिस अधीक्षक सो, अहमदनगर, मा. वैभव कुलुबर्मे अपर पोलिस अधीक्षक अहमदनगर, मा. बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि. अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन, श्री गणेश चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री चारूदत्त खोंडे पोलीस उपनिरीक्षक, श्री समाधान फडोळ पोलीस उपनिरीक्षक व सफौ एकनाथ आव्हाड, पोहेको/ विकास साळवे, पोहेकों सुरज गायकवाड, पोहेकों राहुल यादव, पोना/ प्रविण बागुल, पोना/प्रविण अहिरे, पोकों/प्रमोद ढाकणे, पोकों/नदीम शेख, पोकों/ शिरसाठ, पोकॉ सचिन ताजणे,पोका गणेश लिपणे, पोको सम्राट गायकवाड, पोकों/अमोल गायकवाड, मोबाईल सेल श्रीरामपुर चे पोना/सथिन धनाड, पोना/संतोष दरेकर, पोहकों/अशोक शिदे, पोकों/ अजिनाथ पाखरे, पोकों/ रोहकले, चापोहेका/शकुर सय्यद यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री गणेश चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुरी लेखनिक पोकों/ सतोष राठोड पो.स्टे. हे करत आहेत.

राहुरी तालुक्यातील शेतकरी बंधू यांना पोलीस प्रशासनाव्दारे आवाहन करण्यात येते की, अनावधानाने आपण जुनी इलेक्ट्रीक मोटार कुणाकडुन विना पावती विकत घेतली असेल तर ती चोरीची असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याबाबत राहुरी पोलीस स्टेशन येथे माहीती दयावी. आपले नाव गोपनीय ठेवले जाईल. तसेच सर्व शेतकरी बंधु यांनी जुन्या मोटार विकत घेताना सदर मोटर चोरीची नसल्याबाबत मोटर चे ओरिजनल बिल प्राप्त करून बिलावर नमूद दुकानदार यांचेशी संपर्क साधून सदर मोटर चोरीची नसल्याबाबत खात्री करावी व कमी पैशेत मिळणा-या मोटरपंप चे प्रलोभणास बळी पडु नये.तसेच मोटार चोरी बाबत कुणाला काही माहीती दयावयाची असल्यास श्री. पोनि, संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन संपर्क – 87888 91147, श्री गणेश चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक मोबा नं.९९२३४१७३४९. पोकॉ. राठोड ९७०२९१९६९६ राहुरी पो.स्टेशन 


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!