प्रतिनिधी / जावेद शेख : घर हक्क संघर्ष समिती व नवी मुंबई विकास आघाडीच्या वतीने राज माता जिजाऊ,अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले,फातिमाबी शेख,माता भीमाई, माता रमाई या महामातांचा संयुक्त जयंती महोत्सव दिनांक २८ फरवरी २०२४ रोजी सायंकाळी ४.०० ते ७.०० वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे नवी मुंबई विकास आघाडीच्या वतीने आयोजित केला होता.या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उल्काताई महाजन (सर्वहारा आंदोलन तथा भारत जोडो अभियान समन्वयक), शाहीर संभाजी भगत (विद्रोही कवी), कॉम्रेड सौ.भारती भोयर(विज कामगार व आयटक महिला नेत्या), राजा कांदळकर (संपादक लोकमुद्रा), कुमारी साम्या कोरडे (अध्यक्ष पुरोगामी विद्यार्थी संघटना), प्राचार्य बी.बी.पवार (पीपल एज्युकेशन सोसायटीचे),चंद्राची श्रीनिवासन (जनता दल नवी मुंबई विकास आघाडी घटक पक्ष व संघटना) यांनी मार्गदर्शन केले. सभेचे अध्यक्ष म्हणून हिरामण पगार (घर हक्क संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष) उपस्थित होते. तर स्वागत अध्यक्ष खाजामिया पटेल (महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रिपब्लिकन सेना) उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन करणारे कर्नल चंद्रशेखर रानडे (जनता दल),एडवोकेट राजू कोरडे (शेतकरी कामगार पक्ष),आर.एन. यादव(नवी मुंबई कल्याण व पनवेल प्रभारी समाजवादी पक्ष), एडवोकेट सुजित निकाळजे सल्लागार घर हक्क संघर्ष समिती, यांच्या सहयोगाने कार्यक्रम पार पडले. त्या ठिकाणी नंदकुमार भालेराव यांचे वाढदिवस असल्या कारणाने केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आले व नंदकुमार भालेराव यांना शुभेच्छा देण्यात आले.या कार्यक्रमात शाहीर संभाजी भगत विद्रोही कवी व अजय गायकवाड भीमा कोरेगाव इतिहास क्रांतिकारी गीतकारांचे गीत सादर केले.या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर नवी मुंबई मधील जनसमुदाय उपस्थित होता.
सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर,फातिमा बी.शेख, माता भिमाई माता रमाई यांची संयुक्त जयंती विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे साजरी

0Share
Leave a reply