विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण (अहमदनगर) : जिल्हा परिषद नियोजन समितीच्या सदस्यपदी टाकळी ढोकेश्वरच्या सरपंच व आमदार निलेश लंके समर्थक अरुणा बाळासाहेब खिलारी यांची निवड करण्यात आली आहे. दि.२९ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होणाऱ्या बैठकीत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील विविध विकास कामांसंदर्भात आराखडा सादर करण्यात येणार आहे. पारनेर तालुक्यातील टाकळीढोकश्वर गावच्या सरपंच अरुणा खिलारी यांची एकमेव निवड करण्यात आली आहे.
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये पंचायत समिती विकास आराखडा व जिल्हा परिषद विकास आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आराखडे तयार करण्यासाठी जिल्हा परिषद नियोजन समिती आणि क्षेत्रीय कार्यकारी गटाची स्थापना करण्यात आली असून नगर जिल्ह्यातील १४ सरपंचांची निवड करण्यात आली आहे. क्षेत्रीय कार्यकारी गटांनी त्यांच्याकडील प्रस्तावित उपक्रम व त्यासाठी अंदाजपत्रकीय तरतूद यांचे सादरीकरण करणे तसेच कार्यालयीन विभागाच्या प्रतिनिधींनी त्यांच्या विभागांच्या उपक्रमांचे सखोल रचनात्मक सादरीकरण करणे. तसेच सभागृहापुढे विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची प्रगती व त्याकरिता खर्च करण्यात आलेला निधी व पुढील वर्षात (सन २०४-२५) या मधील प्रस्तावित उपक्रम व त्याकरिता वाटप करण्यात आलेला निधी यांची माहिती सभेसमोर सादर करणे. यासाठी जिल्हा परिषद नियोजन समितीची विशेष सभा दि.२९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जि.प.अ.नगर येथे आयोजित करण्यात आली होती.
जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी टाकळी ढोकेश्वरच्या सरपंच अरुणा खिलारी, १४ तालुक्यातील १४ सरपंचांचा समावेश

0Share
Leave a reply