राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथील रहिवासी लहू आत्माराम ठोंबरे यांचे शुक्रवार दि.23 फेब्रुवारी 2024 रोजी दुःखद निधन झाले असून लहू आत्माराम ठोंबरे हे गोटुंबे आखाडा येथे अनेक दिवसापासून सलूनचा व्यवसाय करत होते त्यांच्या या व्यवसायामुळे त्यांची ग्रामस्थांशी नाळ जोडली होती त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटूंबासह ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली असून सर्व या दुःखद निधनामुळे गोटुंबे आखाडा येथील पंचक्रोशीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी गं.भा.सुमनबाई लहू ठोंबरे, भाऊ सदाशिव ठोंबरे, मुलगा दशरथ ठोंबरे, मुलगी गं.भा.भागुबाई निकम, मुलगी रेणुका बिडे, नातू रवींद्र निकम, नातू अविनाश ठोंबरे, नातू शुभम बिडे इतका परिवार असून त्यांचा दशक्रिया विधी रविवार दिनांक.3 मार्च 2024 रोजी गोटुंबे आखाडा येथील स्मशान भूमी येथे होईल तसेच दशक्रिया विधी दरम्यान ह.भ.प अशोक महाराज शेटे यांचे प्रवचन होईल.
Leave a reply