मुंबई कांदिवली प्रतिनिधी : जनजागृती सेवा संस्था बदलापूर या संस्थेच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त मुंबई कांदिवली येथील जेष्ठ समाजसेवक यांना सामाजिक क्षेत्रातील विशेष योगदाना करीता राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट समाज रत्न पुरस्कार २०२४ करीता निवड झाल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर व सचिव संचीता भंडारी यांनी भारत कवितके यांना निवड पत्रा व्दारे कळविले आहे.रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता बदलापूर येथील अजय राजा सभागृह, बदलापूर एस.टी.स्टंडसमोर, बदलापूर पश्चिम या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत मान्यवरांचे हस्ते ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांना सदर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. भारत कवितके यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यानें सामाजिक क्षेत्रातील विविध क्षेत्रातून भारत कवितके यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Leave a reply