Disha Shakti

राजकीय

वंचित बहुजन युवक आघाडी नायगांवच्या मुलाखती संपन्न

Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव : आदरणीय अँड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश युवा अध्यक्ष मा.निलेश भाऊ विश्वकर्मा प्रदेश सदस्य अक्षय भाऊ बनसोडे यांच्या सूचनेनुसार जिल्हा महासचिव अँड.वैभव लष्करे जिल्हा उपाध्यक्ष, दिपक गजभारे घुंगराळेकर, जिल्हा सचिव बालाजी गायकवाड, जिल्हा सहसचिव बाळासाहेब सोनकांबळे, यांच्या उपस्थितीत आज शासकीय विश्रामगृह नरसी येथे ग्रामीण व शहर पदाधिकारी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

या कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर व सर्व महामानव यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कऱण्यात आली. ‼️कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप जोंधळे गजानन वाघमारे, यांनी मांडून नूतन युवा जिल्हा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले, त्यानंतर इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या, युवकांना मार्गदर्शन करताना, जिल्हा महासचिव अँड.वैभव लष्करे, व जिल्हा उपाध्यक्ष,दिपक गजभारे घुंगराळेकर, यांनी आपल्या भाषणात मुस्लिम आरक्षण, ओबीसी आरक्षण, इत्यादी विषयावर सविस्तरपणे भूमिका मांडली, माझ्यासारख्या सामान्य माणसाला जिल्हा उपाध्यक्ष, बनवून जो विश्वास दाखवला, त्या विश्वासाला युवकांच्या माध्यमातून युवा पर्व उभा करून पक्ष बळकट करनेकामी व युवकाना रोजगार मिळवून देणेबात व युवकांच्या साठी वेगवेगळ्या योजनेचा फायदा व न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 यावेळी, जिल्हा महासचिव अँड.वैभव लष्करे, तालुकाध्यक्ष साहेबराव कोपरेकर, तालुका महासचिव, माधवराव पाटील लव्हाळे, जिल्हा उपाध्यक्ष, दिपक गजभारे घुंगराळेकर, जिल्हा सचिव,बालाजी गायकवाड, सहसचिव बाळासाहेब सोनकांबळे, ता.उपाध्यक्ष, सतीश वाघमारे, ता.उपाध्यक्ष, प्रभाकर घटेवाड, ता.उपाध्यक्ष, प्रताप बंडे, ता.सचिव, विलास वाघमारे, ता.संघटक शिवाजी पवार, इत्यादी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!