Disha Shakti

क्राईम

गुजरात राज्यातुन पुण्यात विक्रीसाठी जाणारी सुगंधीत तंबाखु नगर शहरामध्ये जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेश दिलेले आहेत. नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार संतोष लोढे, सचिन अडबल, संतोष खैरे, फुरकान शेख, रोहित मिसाळ, शिवाजी ढाकणे, प्रशांत राठोड यांचे पथक तयार करुन त्यांना अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना देवुन पथकास रवाना केले होते.  

 स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पथक दिनांक 02/03/2024 रोजी अहमदनगर शहरामध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पोनि श्री दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुप्त बातमीदारा मार्फत इसम नामे अशोक बाबासाहेब जावळे रा. बीड हा त्याचे ताब्यातील पांढरे रंगाचे टेम्पोमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेली व शरिरास अपायकारक होईल असा खाद्य पदार्थ सुगंधीत तंबाखु ही गुजरात राज्यातुन पुणे या ठिकाणी विक्री साठी घेवुन जात असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली. सदर बातमीची हकीगत पोनि श्री दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन सुगंधीत तंबाखुची वाहतुक करणारे टेम्पोवर कारवाई करणेबाबत बाबत आदेश दिले.

 वरील पथक अहमदनगर ते मनमाड जाणारे रोडवर सावेडी नाका या ठिकाणी जावुन सापळा रचुन थांबले असता त्यांना बातमीतील वाहन येतांना दिसल्याने सदर वाहन चालकास थांबवुन टेम्पोमधील मालाची खात्री करता सदर टेम्पोमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेली व शरिरास अपायकारक होईल असा खाद्य पदार्थ सुगंधीत तंबाखु मिळुन आली. सदर टेम्पो चालकास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव अशोक बाबासाहेब जावळे वय 33 वर्षे, रा. जवळाला, ता. पाटोदा, जि. बीड असे असल्याचे सांगितले. सदर मिळुन आलेल्या तंबाखुबाबत टेम्पो चालकास अधिक विचारपुस करता त्याने सदरची सुगंधीत तंबाखु ही 1) सुरेंद्र प्रसाद रा. सेक्टर 63, नोएडा, दिल्ली, 2) वसिम शेख रा. अहमदाबाद, गुजरात, 3) चिराग ट्रान्सपोर्ट गुजरात, यांनी टेम्पोमध्ये भरुन देवुन ती विक्रीकरीता पुणे या ठिकाणी पाठविले असल्याचे सांगितले. 

 ताब्यात घेण्यात आलेल्या टेम्पोमध्ये 8,30,000/- रुपये किमतीची 830 किलो सुगंधीत तंबाखु तसेच 8,00,000/- रुपये किमतीचा टेम्पो क्रमांक एम. एच. 14 के. क्यु. 9174 असा एकुण 16,30,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेला इसम 1) अशोक बाबासाहेब जावळे, 2) सुरेंद्र प्रसाद रा. सेक्टर 63, नोएडा, दिल्ली (फरार), 3) वसिम शेख रा. अहमदाबाद, गुजरात(फरार), 4) चिराग ट्रान्सपोर्ट गुजरात (फरार), यांचेविरुध्द पोकॉ/2600 रोहित मधुकर मिसाळ नेम – स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. 289/2024 भादवि कलम 328, 188, 272, 273, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे. सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साो.पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. श्री. अमोल भारती साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!