इंदापूर प्रतिनिधी / प्रविण वाघमोडे : भिगवण बारामती नवीन रोडचे काम चालू झाल्यापासूनच वादात चालू झाले. नवीन रोड रुंदीकरण यासाठी जमीन अधिग्रहण हा वादाचा मुद्दा ठरला यातून मार्ग काढत रोडचे काम अंतिम टप्प्यात येत असताना रोडचे काम कमालीचे सुस्तवले आहे म्हणावे लागेल कारण ज्या वेगाने बारामती पासून काम चालू झाले तो वेग कुठे तरी हरवले सारखे झाला आहे. मदनवाडी हद्दीत काम चालू झाल्यापासून या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धुळीचा सामना करावा लागत आहे. यातून ज्यांना धुळीची अलार्जी आहे त्यांना दवाखाना चालू झाला तसेच रस्ता उकरून ठेवल्यामुळे प्रवाशाचे अतोनात हाल होत आहेत जेमतेम दोन किलोमीटरचे अंतर पार करताना दोन चाकी वाहन चालकाला नाकी नऊ येत आहे. काही वेळेस तर ट्रॅफिक झाले तर दोन दोन तास सुटका होत नाही तसेच ट्रॅफिक कधी होईल सांगता येत नाही. चालू झालेला रस्ता काही ठिकाणी साईड पट्टी आर्धा ते पाऊण फुटाणे खाली खचली आहे. यात दोनचाकी वाहने अडकून पडण्याची शक्यता असते तसेच ऊस वाहतूक ट्रॅक्टर पलटी होण्याची शक्यता असते याखाली येऊन जिवीत हानी होऊ शकते पण रस्ता बनविणारी कंपनीला मात्र याचे भान राहिले नाही.उकरलेल्या रस्त्यावरून ऊस वाहतूक होत असताना मोठ्या प्रमाणावर ऊस रस्त्यात पडतो काही ट्रॅक्टर चालक थांबून भरून नेहतात तर काही तसेच जातात यात ऊस वाहतूकदार, कारखाना, रस्ता बनविणारी कंपनी यांचे कसलेही नुकसान होत नाही पण त्या शेतकऱ्याचा कोण विचार करणार आहे की नाही अशा प्रश्न पडतो कारण शेतकऱ्याला एकाद दुसरे पीक सोडले तर कोणत्याच पिकाला भाव नाही पण रासायनिक खते, बियाणे, मशागत, मजुरी याचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला असताना असे शेतकऱ्याचे नुकसान होत आहे व याचे कोणाला भानच राहिले नाही.
लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते पुढील महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात दंग झालेले पहावयास मिळतात यांना शेतकऱ्याचे काहीच देणे घेणे नाही आणि आपला देश कृषीप्रधान देश आहे. सर्व सामान्य जनतेचे घेणेदेणे नेतेमंडळी आहे का ?? सार्वजनिक बांधकाम विभाग काय करत आहे त्यांना यावर काही भूमिका घेऊ वाटत नाही का ??? हे मोठे प्रश्न आहेत