Disha Shakti

क्राईम

राहुरीतील सहाय्य्क पोलीस उपनिरीक्षक 15 हजाराची लाच घेताना लाचलूचपतच्या जाळ्यात, नाशिकच्या लाचलूचपत पथकाची कारवाई 

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / युनूस शेख : राहुरी पोलीस ठाण्यातील सहाय्य्क पोलीस उपनिरीक्षक 15 हजाराची लाच घेताना लाचलूचपतच्या जाळ्यात अडकला असून सदरची कारवाई नाशिकच्या लाचलूचपत पथकाच्यावतीने करण्यात आली आहे.

▶️  तक्रारदार – पुरुष, वय- 50 वर्ष

▶️  आलोसे- 1) ज्ञानदेव नारायण गर्जे, स. पो. उपनि राहुरी पोलिस स्टेशन, अहमदनगर. राहणार – भाग्योदय रो हाउस तपोवन रोड, राजबिर हॉटेल समोर मुक बधीर विद्यालय जवळ अहमदनगर.

ला. प्र. वि. ▶️  लाचेची मागणी- 20000/- रुपये दिनांक 05/03/2024 रोजी

▶️  लाच स्विकारली –

15000/ रुपये दिनांक-05/03/2024 रोजी

▶️  हस्तगत रक्कम-15000/-रुपये

▶️  लाचेचे कारण

यातील तक्रारदार हे आय. एम. मोटवानी वाइन शॉप राहुरी, अहमदनगर येथे व्यवस्थापक म्हणून नोकरीस आहे. ते लिकरचां सप्लाय करतात. तक्रारदार यांच्या आय. एम. मोटवानी वाइन शॉपमध्ये नगर जिल्ह्यातून येणाऱ्या लिकर खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर व तक्रारदार यांच्यावर कारवाई करून तक्रारदार यांना गुन्ह्यात आरोपी करून दुकानाचे परवाना रद्द करण्याची धमकी देऊन तक्रारदार व त्याच्या ग्राहकांवर कारवाई न करण्यासाठी दरमहा 20,000 रुपयाची मागणी करून तडजोडी अंती 15000 रू लाचेची रक्कम पंचा समक्ष स्वीकारली. सदर रक्कम स्वीकारताना लोकसेवक सहा. पो. उप. निरि. ज्ञानदेव नारायण गर्जे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. आलोसे ज्ञानदेव नारायण गर्जे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचे विरुद्ध राहुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.

▶️ सापळा व तपास अधिकारी श्री. निलिमा केशव डोळस पोलीस निरीक्षक ला..प्र.वि. नाशिक मोबा. 8108065888

▶️  सापळा पथक

पोलिस नाईक संदीप हांडगे. पोलिस शिपाई सुरेश चव्हाण.

▶️  मार्गदर्शक 1) मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक  मोबा.नं. 91 93719 57391

2) मा. श्री माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक, ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक, मो नं 9404333049

3) श्री. नरेंद्र पवार, वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.मोबा.नं. 9822627288

▶️ आलोसे यांचे सक्षम अधिकारी* मा. पोलिस अधीक्षक अहमदनगर

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.

अॅन्टी करप्शन ब्युरो, नाशिक

@ दुरध्वनी क्रं. – 0253-2578230@ टोल फ्रि क्रं. 1064*


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!