भिगवण प्रतिनिधी / प्रवीण वाघमोडे : माननीय पोलीस अधीक्षक सो पंकज देशमुख साहेब यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही भिगवन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैद्य धंद्याबाबत माहिती घेतली असता आम्हास गोपनीय बातमीदारां मार्फत बातमी मिळाली की मौजे शेटफळगडे गावचे हद्दीत हॉटेलवर व किराणा दुकानांमध्ये अवैद्य दारू विक्रीचा व्यवसाय चालू आहे अशी बातमी मिळाली की लागलीच पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक खाडे साहेब सहाय्यक फौजदार वीर पोलीस नाईक मुळीक यांना सदर बातमी बाबत सांगून सदर ठिकाणी रेड करने कामे रवाना झालो असता मौजे शेटफळगडे गावच्या हद्दीत हॉटेल मध्ये व किराणा मालाचे दुकानांमध्ये अवैध दारू विक्री चालू असल्याबाबत आम्हास खात्री झाल्याने आम्ही सदर ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी 25716/-रुपयाचा देशी-विदेशी दारू चा मुद्देमाल मिळून आला असून तो मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर दारू विक्री करणाऱ्या इसमानवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचे कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेब,अप्पर पोलीस अधीक्षक जाधव साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी राठोड साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली भिगवन चे प्रभारी अधिकारी संदेश बावकर साहेब,पोलीस उपनिरीक्षक खडे साहेब, सहाय्यक फौजदार वीर, पोलीस नाईक मुळीक,पोलीस कॉन्स्टेबल मुलानी,होमगार्ड रमेश कदम, होमगार्ड पिसे, होमगार्ड अप्पा सातपुते, यांनी केले असून पोलीस नाईक मुळीक यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक खाडे तपास करीत आहेत.
भिगवनचे पोलीस निरीक्षक संदेश बावकर यांची अवैध धंद्यावर जोरदार कारवाई 25716 /- रुपयाचा देशी विदेशी दारूचा मुद्देमाल केला हस्तगत

0Share
Leave a reply