नाशिक प्रतिनिधी / खंडू कोळेकर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नाशिक परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ बी जी शेखर यांची बदली केली असता डॉक्टर शेखर यांनी याबद्दल विरोधात केंद्रीय प्रशासनिक न्यायाधीकरणात (कॅट) याचिका दाखल केली होती. या याचिकेचा निकाल लागला असून डॉक्टर शेखर यांना पुन्हा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक पदी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
बदलीच्या विरोधात पोलिस निरीक्षकांची ‘मॅट’मध्ये धाव घेतली असता कार्यकाळ पूर्ण नसताना बदली केल्याचे कारण गृह विभागाने ३१ जानेवारीला पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यावेळी तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांची बदली पुणे येथील मोटार परिवहन विभागात केली. तर त्यांच्या जागी दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती केली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. शेखर पाटील यांचीही बदली केली होती.
तर ठाणे शहराचे सहआयुक्त दत्तात्रेय कराळे यांची नियुक्ती करण्यात आली. कराळे यांनी २ फेब्रुवारी रोजी नाशिक परिक्षेत्राचा पदभारही स्विकारला. डॉ. शेखर यांनी बदलीविरोधात कॅटमध्ये याचिका दाखल करताना, दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी, तसेच सेवानिवृत्तीस तीन महिने शिल्लक असताना बदली केली अशी याचिकेत म्हटले होते. न्यायमूर्ती एम. जी. सेवलीकर व सदस्य राजींदर कश्यप यांच्या पीठाने आदेशनुसार डॉ. शेखर यांच्या बदलीस स्थगिती देत पुन्हा नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्तीचे आदेश दिले आहेत.
Leave a reply