Disha Shakti

राजकीय

कर्जदार शेतकऱ्यांना जिल्हा बॅंकचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांचे ‘हे’ महत्वाचे आवाहन !

Spread the love

नगर प्रतिनिधी / जितू शिंदे  : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहे. यंदाच्या वर्षीं आज अखेर अल्पमुदत शेती कर्जाकरता ३ हजार २११ कोटींचे कर्ज वाटप केले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अल्पमुदत कर्ज वाटप करणारी आपली बँक एकमेव आहे. ३१ मार्च २०२४ अखेर वसूलास पात्र कर्ज रक्कम कर्जदार शेतक-यांनी वेळेत भरणा करून ३ लाखापर्यंतच्या पीक कर्जास शून्य टक्के व्याजदराचा फायदा घेण्याचे आवाहन अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले यांनी केले. ते जिल्हा बँक आयोजीत जिल्ह्यातील वि.का.से. सोसायटीचे सचिव जिल्हा बँक शाखाधिकारी, वसूली अधिकारी यांच्या संयुक्त कर्ज वसूली आढावा बैठकीत अहमदनगर येथील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह येथे आयोजीत प्रसंगी बोलत होते.ते म्हणाले, महाराष्ट्र शासनाने पीक कर्ज वसूलीला स्थगिती दिली असली तरी शासनाने या कर्जाचे पुनर्गठन करुन देण्याबाबत सूचना केल्या आहेत. परंतु अशा प्रकारचे कर्जाचे पुनर्गठण केल्यास पुणर्गठण तारखेपासून या कर्जास ११% व्याजदर परवडणारा नसल्याने शेतक-यांनी आपले कर्ज ३१ मार्चपूर्वीच भरावे व शून्य टक्क्याचा लाभ घ्यावा. या मुदतीत पीककर्ज भरणा-या शेतक-यांना १० एप्रिलच्या आत पुन्हा पीककर्ज जिल्हा बँक देणार असल्याने याचा फायदा नियमित कर्जदार म्हणून शेतक-यांनी घ्यावा असेही आवाहन कर्डिले यांनी केले.

या प्रसंगी संचालक प्रशांत गायकवाड म्हणाले शासनाने नुकताच सहकार कायदयात बदल करुन जिल्हा केडरला पून्हा पुनर्जीवित केलेले आहे. या प्रसंगी खासदार सुजय विखे पाटील, बँकेचे जेष्ठ संचालक माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, बँकेच्या संचालक गितांजली शेळके, संचालक अमोल राळेभात, सरव्यवस्थापक जयंत देशमुख, मॅनेजर, वरिष्ठ अधिकारी, तालुका विकास अधिकारी, जिल्ह्यातील शाखाधिकारी, वसुली अधिकारी, इन्सपेक्टर, वि.का. सोसायटीचे सचिव उपस्थित होते. आभार सरव्यवस्थापक एन. के. पाटील यांनी मानले


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!